महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 5, 2023, 3:13 PM IST

Updated : Apr 5, 2023, 3:51 PM IST

ETV Bharat / entertainment

Kiccha Sudeep to join BJP : 'मक्की' फेम किच्चा सुदीप भाजपचा करणार केवळ प्रचार

लोकप्रिय कन्नड चित्रपट कलाकार किच्चा सुदीप आणि दर्शन थुगुडेपा बुधवारी भारतीय जनता पक्षात सामील होऊ शकतात. हे दोन्ही स्टार्स आज दुपारी बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये पार्टीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र किच्चाने आपण पक्षात सामील होणार नसल्याचे पण प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे

Etv Bharat
किच्चा सुदीप भाजपमध्ये सामील होणार?

बंगळुरू- 'मक्की' या चित्रपटातून प्रसिध्दीच्या झोतात आलेला अभिनेता सुदीप संजीव (किच्चा सुदीप) आणि दर्शन थुगुडेपा कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी बुधवारी (5 एप्रिल) भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याची शक्यता वर्तवळी जात होती. मात्र स्वतः किचा सुदिपने पत्रकारांशी बोलताना तो भाजप पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सांगितेल.

निवडणूक लढवणार नाही किच्चा सुदिप - आपल्या आयुष्यात अडचणीच्या काळात सध्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मोठी मदत केली आहे. त्याची परतफेड करणे शक्य नाही. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली निडणूक होणार असल्याने मी प्रचार करण्याचे काम करणार असल्याचे किचा सुदिप यांने सांगितले. त्यामुळे तो भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या व तो निवडणूकही लढवणार असल्याच्या सर्व अटकळांना पूर्व विराम मिळाला आहे.

किच्चा सुदीप आणि दर्शन थुगुडेपा भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा - किच्चा सुदीप आणि दर्शन थुगुडेपा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात सामील होतील अशी चर्चा सुरू होती. 10 मे 2023 रोजी कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांवर निवडणूक होणार आहे आणि 13 मे 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. किच्चा सुदीपच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या अनेक अफवा यापूर्वीही आल्या आहेत. त्यांना यापूर्वी अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाल्या आहेत, परंतु अद्याप त्यांनी मन बनवलेले नाही. राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्यास सर्वप्रथम चाहत्यांचा सल्ला घेईन, असेही ते म्हणाला होता.

साऊथ स्टार्समध्ये राजकारणाचे आकर्षण - सुदीप कर्नाटक सरकारच्या 'पुण्यकोटी दत्तू योजना' या योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त झाल्यामुळे देखील चर्चेत होता. या योजनेअंतर्गत कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्यासाठी ३१ गायी दत्तक घेणार असल्याचे किच्चा संदीप यांनी सांगितले होते. किच्चा सुदीप आणि दर्शन थुगुडेपा व्यतिरिक्त, अनेक दक्षिणेचे कलाकार आहेत जे अभिनयानंतर राजकारणात पाऊल ठेवताना दिसले आहेत, ज्यात टॉलिवूड सुपरस्टार रजनीकांत यांचे नाव आहे. मात्र त्याने 2021 मध्ये स्वत: ला यापासून दूर केले. यापूर्वी कर्नाटकातून प्रकाश राज यांनी लोकसभा निवडूक लढवली होती व पराभवाचा सामना केला होता. गेल्या तमिळनाडू विभानसभेच्या निवडणूकीत कमल हासन यांनीही आपले नशिब आजमावून पाहिले आहे. साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी पक्ष स्थापन करुन आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठे आव्हान निर्माण केले होते. त्यांचा बाऊ पवन कल्याणही राजकारणात सक्रिय झाला आहे.

हेही वाचा -Rashmika Mandanna Birthday : Vnr Trio टीमने रश्मिका मंदान्नाला पहिल्या पोस्टरसह दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Last Updated : Apr 5, 2023, 3:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details