मुंबई - Katrina and Vicky 2nd Wedding Anniversary :अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज 9 डिसेंबर रोजी या जोडप्यानं राजस्थानमध्ये शाही लग्न केलं होतं. कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होते. विकीनं लग्नाच्या एक दिवस आधी कतरिना कैफला प्रपोज केलं होतं. 9 डिसेंबर रोजी या सुंदर जोडप्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. विकी कौशलला सुरुवातीपासूनच कतरिना कैफ आवडत होती. विकीनं कधीच विचार केला नव्हता की, त्याच्यासोबत कतरिना लग्न करेल. कतरिना ही विक्कीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे.
विकी कौशलनं केलं होत प्रपोज : विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या व्यग्र दिनचर्येतमधून वेळ काढून एकामेकांबरोबर वेळ घालवतात. अलीकडेच विकी कौशलनं खुलासा केला होता की, तो लग्नाच्या एक आठवडा आधी कतरिनाच्या कुटुंबाला भेटला होता आणि त्यानं लग्नाच्या एक दिवस आधी कतरिना कैफला प्रपोजही केलं होतं. कतरिना आणि विकी एका अवॉर्ड शोमध्ये एकत्र दिसले होते. यावेळी एका संभाषणातून सलमान खानसमोर विकी कौशलनं कतरिना कैफचं कौतुक केलं होत. त्यावेळी भाईजान विकीच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. या अवॉर्ड शोमध्ये विकीनं कतरिना कैफला उघडपणे सांगितलं होतं की, 'तू एक चांगला विकी कौशल शोधून त्याच्याशी लग्न का करत नाहीस'. यावर अनेकजण हसले होते. त्यानंतर कतरिनाही उभी राहिली आणि तिनं एक गोड स्माईल दिली होती.