महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी विकी आणि कॅटरिनाने गाठले हिल स्टेशन - कॅटरिना कैफच्या प्रेग्नेंसी न्यूज

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी हिल स्टेशनवर गेले आहेत. फोटो पहा

विकी आणि कॅटरिना
विकी आणि कॅटरिना

By

Published : Dec 8, 2022, 11:30 AM IST

मुंबई- बॉलिवूडचे स्टार कपल विकी कौशल आणि कॅरिना कैफ यांनी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची पूर्ण तयारी केली आहे. 9 डिसेंबर रोजी हे जोडपे त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे. अशा परिस्थितीत या सेलिब्रेशनसाठी हे जोडपे खास हिल स्टेशनवर पोहोचले आहे. कॅटरिना कैफने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.

पर्वतांमध्ये लग्नाचा पहिला वाढदिवस - कॅटरिना कैफने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कॅटरिनाच्या चेहऱ्यावर पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. कॅटरिना कैफने हे फोटो शेअर करत त्याला 'पहाडो में' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोंमध्ये, कॅटरिनाने क्रीम आणि लाल रंगाच्या कॉन्ट्रास्टमध्ये फुलांचा स्वेट शर्ट घातला आहे. हे फोटो विकीने क्लिक केले आहेत, जे कॅटरिनाने फोटोंच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे.

दोघांचे लग्न कधी झाले?- जवळपास दीड वर्षे शांतपणे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केले. विकी-कॅटरिनाचे लग्न अतिसुरक्षेमध्ये पार पडले आणि मीडिया आणि पाहुण्यांना येथे फोनही घेण्याची परवानगी नव्हती. 9 डिसेंबर 2022 रोजी या जोडप्याने सात फेऱ्या मारल्या.

चाहत्यांना प्रतीक्षा गुड न्यूजची- लग्नानंतर कॅटरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी पुन्हा जोर धरला आहे. कॅटरिना कैफ तिच्या वाढदिवशी चाहत्यांना तिच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी देईल, असे मानले जात होते, पण असे काहीही समोर आले नाही. आता चाहत्यांना आशा आहे की लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हे जोडपे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंदाची बातमी देऊ शकेल. कॅटरिना आणि विकीला त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन.

हेही वाचा -धर्मेंद्रच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्य अजय देवगणने दिल्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details