महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kartik Aaryan shehzaad Movie : कार्तिक आर्यनचा 'शेहजादा' नेटफ्लिक्सवर, जागतिक स्तरावर टॉप 10 मध्ये ट्रेंड - कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन

अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांचा 'शेहजादा' चित्रपट जागतिक स्तरावर टॉप 10 मध्ये ट्रेंड करत असून या चित्रपटाने पाहिजे तशी कमाई केली नाही. मात्र काही फॅन्सला हा चित्रपट पसंतीस पडला आहे.

kartik Aaryan and kriti sanon Movie
कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांचा 'शेहजादा' चित्रपट

By

Published : May 4, 2023, 5:02 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. कार्तिक आर्यनचा चाहता वर्ग फार मोठा आहे. कार्तिकने या चित्रपटा अभिनयाबरोबरच शेहजादा या चित्रपटाचा निर्माता देखील आहे. हा चित्रपट साउथच्या अभिनेता अल्लू अर्जूनच्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक होता. मात्र, कार्तिक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. कार्तिकचा हा चित्रपट सध्या ओटीटीवर बघायला मिळत आहे. रोहित धवन दिग्दर्शित 'शेहजादा'मध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉन, मनीषा कोईराला परेश रावल, आणि रोनित रॉय या कालाकरांनी भूमिका साकारल्या आहेत.

नेटफ्लिक्सवर शेहजादा चित्रपट : शेहजादा हा चित्रपट अला वैकुंठापुररामलू या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत होता. एका मुलाखतीत कार्तिक 'शेहजादा' या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाला, 'शेहजादा हा एक खास चित्रपट आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट बघायला मिळेल. तसेच नंतर त्याने म्हटले की, मला आनंद आहे. जगभरातील प्रेक्षक हा चित्रपट पाहत आहेत आणि त्याला पाहिजे तसे प्रेम देत आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला. जवळपास 20 दिवसांपासून नेटफ्लिक्सवर, जागतिक स्तरावर टॉप 10 मध्ये ट्रेंड करत आहे. हा प्रतिसाद पाहून मी खरोखरच भारावून गेलो आहे. अशा भावना कार्तिकने यावेळी व्यक्त केल्या आहेत.

पुन्हा एकादा कार्तिक-कियारा झळणार रूपेरी पडद्यावर: कार्तिकचा आगामी चित्रपट सत्यप्रेम की कथामध्ये कियारा अडवाणीसोबत रूपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात फॅन्सला कार्तिक आणि कियारा यांची ऑनलाईन केमिस्ट्री पुन्बहा घायला मिळेल. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर भूल भुलैया 2 नंतर या कलाकारांनी दुसऱ्यांदा हा सोबत काम केले आहे. समीर विधवांस दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला निर्मित, हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे पूर्वीचे शीर्षक सत्यनारायण की कथा, असे होते मात्र या शीर्षकामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी शीर्षकातील बदलाची घोषणा करण्यासाठी एक निवेदनीद्वारे जारी केले.

अभिनेता कार्तिकने देखील आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. यात त्याने म्हटले आहे की, भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून शीर्षकमध्ये बदलले जाईल, जरी ते पूर्णपणे अनावधानाने असले तरीही शेवटी, 2022 मध्ये निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलून सत्यप्रेम की कथा असे ठेवले.

हेही वाचा :Sanjay Dutt remembers mother : संजय दत्तने आई नर्गिसच्या पुण्यतिथीनिमित्त थ्रोबॅक फोटोसह लिहिली भावूक पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details