मुंबई - कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेला चित्रपट 'भूल-भुलैया-2' ने दुसऱ्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर शतक ठोकले आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल-भुलैया-2' 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. कार्तिक आर्यनचा हा पहिलाच चित्रपट आहे, ज्याने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करण्याचा विक्रम केला आहे. यासह हा चित्रपट या वर्षातील (2022) 100 कोटींची कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटासह कार्तिक आता 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. सक्सेस पार्टीमध्ये कार्तिक आर्यनने अभिनेता राजपालला मांडीवर उचलून घेतले होते.
सक्सेस पार्टीमधली धमाल - जेव्हा चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला तेव्हा एक जबरदस्त सक्सेस पार्टी झाली. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आणि निर्माता भूषण कुमार देखील उपस्थित होते. यावेळी खूप धमाल झाली आणि कार्तिक आर्यनने राजपाल यादवला मांडी पकडून उचलून आपला आनंद व्यक्त केला. आता हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर कमाई - हा चित्रपट देशातील जवळपास 3200 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (20 मे) 14.11 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि यासह हा चित्रपट यावर्षीच्या ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.