मुंबई- बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन गेल्या आठवड्यात अमेरिकेला रवाना झाला. कार्तिक आता त्याच्या सुट्टीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. यूएसएमध्ये असताना, अभिनेता कार्तिकने डल्लासमध्ये होळीच्या कार्यक्रमातही आपली उपस्थिती दर्शविली. कार्तिकची शेहजादा चित्रपटाची अपेक्षित कमी कामगिरी झाली नाही, परंतु तो निर्माता म्हणून या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा पुढे आला आहे. हा अनुभव त्याला पुढे खूप काही शिकवणारा ठरू शकतो.
कार्तिकच्या डल्लास होळी कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. त्याच्या कारच्या काचेवर 'आय लव्ह यू कार्तिक' लिहिणाऱ्या मुलीपासून ते स्टेजवर येऊन 'आय लव्ह यू' म्हणणाऱ्या एका छोट्या चाहत्यापर्यंत, डल्लास होळीच्या कार्यक्रमातील कार्तिकच्या व्हिडिओंनी ट्विटर भरले आहे. अशाच एका व्हायरल व्हिडीओमध्ये कार्तिक एका महिला चाहतीला त्याच्या चेहऱ्यावर रंग लावण्याची परवानगी देताना दिसत आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या कारमधून बाहेर येण्याआधीच जमाव बेकाबू झाला होता. हजारोंच्या संख्येने त्याचे चाहते हजर होते. त्याने जेव्हा गाडीच्या टप्पावरुन जमावासोबत सेल्फी घेतली तेव्हा एकच जल्लोष पाहायला मिळाला. कार्तिकने आपल्या मस्त डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 'भूल भुलैया 2 हुक स्टेप्स' या गाण्यावर नाचण्यापासून ते 'मुंडा सोना हूं मैं' या गाण्यावर नाचण्यापर्यंत कार्तिकने कार्यक्रमात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. परदेशातील देसी होलीची झलक त्याने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरदेखील त्याने शेअर केली.
चित्रपटाच्या आघाडीवर, कार्तिक पुढे रोमँटिक कॉमेडी सत्यप्रेम की कथामध्ये दिसणार आहे. आगामी चित्रपटात कार्तिक त्याची भूल भुलैया 2 सहकलाकार कियारा अडवाणीसोबत पुन्हा एकत्र येणार आहे. कार्तिक आर्यनकडे पुढील दोन वर्षांसाठी चित्रपटांची एक मनोरंजक लाइनअप आहे आणि यादीमध्ये कॅप्टन इंडिया, आशिकी 3, कबीर खानचा शीर्षक नसलेला चित्रपट आणि अलीकडेच जाहीर झालेला भूल भुलैया 3 यांचा समावेश आहे. या चित्रपटातून तो पुन्हा एकदा रुह बाबा बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निश्चित असल्याचे संकेत निर्माता भूषण कुमार यांनी नुकतेच दिलो आहेत.
हेही वाचा -Farah Khan Chills With Sania Mirza : सानिया मिर्झाने निरोप समारंभानंतर मैत्रिण फराह खानसोबत घालवला निवांत वेळ