मुंबई - कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेला नमाह पिक्चर्सचा समीर विद्वांस दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट सत्यप्रेम की कथा २९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियादवाला निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित हिंदी चित्रपट शूटिंगच्या सुरुवातीपासून हा चित्रपट सतत चर्चेत होता त्याच्या शीर्षकामुळे. सत्यनारायण की प्रेमकथा हे नाव बदलून आता त्या चित्रपटाचे नामकरण सत्यप्रेम की कथा असे करण्यात आले आहे. नुकतीच या चित्रपटाची प्रदर्शन तारीखही जाहीर करण्यात आली.
सत्यप्रेम की कथा ही संगीतमय प्रेमकथा आहे ज्याची घोषणा झाल्यापासूनच चर्चेचा विषय बनली आहे. या चित्रपटाद्वारे कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी भूल भुलैया २ नंतर पुन्हा एकदा एकमेकांसोबत पडद्यावर दिसणार आहेत. यशस्वी चित्रपटांचे कलाकार म्हणून जाणले जाणारे कियारा आणि कार्तिक हे आज इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत, ज्यांना पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते.