मुंबई - Kareena Kapoor Khan : करीना कपूर सध्या ओटीटीवरील तिच्या 'जाने जान' चित्रपटामुळं चर्चेत आहे. हा करिनाचा ओटीटी डेब्यू चित्रपट आहे, ज्याचं ती जोरदार प्रमोशन करतेय. अलीकडेच ती एका मुलाखतीत आपल्या करियर, लग्न आणि मुलाच्या नावाच्या वादावर मोकळेपणानं बोलताना दिसली. या मुलाखतीत तिनं सैफ अली खानसोबत लग्न केल्यामुळं तिला किती ट्रोल केलं होतं याबद्दल सांगितलं. करिनाच्या म्हणण्यानुसार, दोघांमधील वयाच्या 10 वर्षांच्या फरकानं त्यांना काही फरक पडत नाही. याशिवाय त्यांचं धर्म वेगळे आहेत याकडे त्यांनी कधीही लक्ष दिलं नाही. पुढं तिनं सांगितलं, लोक आंतर-धर्मीय संबंधांवर चर्चा करण्यात जास्त वेळ घालवतात. मात्र आम्हाला या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही.
वयातील फरकामुळं झाली होती ट्रोल : करीनाला जेव्हा विचारण्यात आलं की, तिच्या वयातील फरकामुळं तिला ट्रोल करणार्या ट्रोल्सला ती काय म्हणेल, तेव्हा तिनं उत्तर दिलं, वयाचा फरक कुठे आहे, तो नेहमीपेक्षा जास्त हॉट आहेत. मला आनंद आहे की मी 10 वर्षांनी लहान आहे, त्याने माझी काळजी घ्यावी, मला असं वाटतं. तो 53 वर्षांचा आहे, असं वाटत नाही. वयामुळे काही फरक पडत नाही. आदर , प्रेम आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या सहवासाचा आम्ही आनंद घेतो, हे महत्त्वाचं आहे. करीनानं पुढं सांगितलं, सैफला काळजी वाटत होती की तो तिच्या उत्साहाशी जुळवू शकेल की नाही. सैफ आणि माझ्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांना पसंत करतो. तो कोणता धर्म पाळतो किंवा त्याचं वय काय हे महत्त्वाचं नाही, हा चर्चेचा विषयही नाही.