मुंबई- बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांच्यामध्ये वाद होतात आणि त्यांना एकमेकांचे तोंड पाहणेही आवडत नाही. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्समध्ये या प्रकारचे शीतयुद्ध सुरू आहे. दरम्यान, करण जोहर आणि कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर भूकंप निर्माण केला आहे. खरंतर हे दोन्ही सेलिब्रिटी एका इव्हेंटमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले.
आता तुम्ही विचार करत असाल की कार्तिक आणि करणसोबत दिसण्यात काय अडचण आहे. तर, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेला 'दोस्ताना' हा अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेला चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कार्तिक आर्यनला पहिल्यांदा कास्ट करण्यात आले होते, पण नंतर त्याला करण जोहरच्या या चित्रपटातून डच्चू देण्यात आला होता.
यानंतर करण जोहरने कार्तिकला त्याच्या कोणत्याही चित्रपटात कास्ट केले नाही. तेव्हापासून हे दोन्ही सेलिब्रिटी कधीही एकत्र दिसले नाहीत. आता गेल्या गुरुवारी मुंबईतील एका कार्यक्रमात कार्तिक आर्यन आणि करण जोहर एकाच मंचावर एकत्र दिसले होते.