महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kangana in strapless outfit : कंगना रणौतने पार्टीत घातला स्ट्रॅपलेस ड्रेस, नेटिझन्सने दाखवला दुपट्टीपणाचा आरसा - pictures in strapless outfit

कंगना रणौतने शुक्रवारी रात्री मुंबईत तिच्या प्रॉडक्शनने निर्मिती केलेल्या टिकू वेड्स शेरूचे यश साजरे केले. टिकू वेड्स शेरूच्या सक्सेस पार्टीसाठी कंगनाने जबरदस्त पोशाख घातला आणि नंतर सोशल मीडियावर तिच्या लुकची पोस्ट शेअर केली. तिच्या या नव्या लूकमुळे तिने ट्रोलर्सना आमंत्रण दिले आहे.

Kangana in strapless outfit
कंगना रणौतने पार्टीत घातला स्ट्रॅपलेस ड्रेस

By

Published : Jul 1, 2023, 2:33 PM IST

मुंबई - कंगना रणौतच्या मणिकर्णिका प्रॉडक्शन हाऊसने बनवलेला टिकू वेड्स शेरू हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नवनीत कौर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलाय. आपल्या पहिल्याच ओटीटी निर्मितीचे यश कंगनाने शुक्रवारी रात्री साजरे केले. टिकू वेड्स शेरूच्या सक्सेस पार्टीसाठी कंगना रणौत गौरी आणि नैनिकाने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये शोभून दिसत होती. कंगनाच्या या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालाय.

कंगनाने इंस्टाग्रामवर फोटोंची एक स्ट्रिंग शेअर केली आहे ज्यात ती सेलिब्रिटी स्टायलिस्ट तान्या घावरीने एकत्रित केलेला तिचा नवीनतम लुक दाखवताना दिसत आहे. फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, 'आई म्हणायची खेळण्याची एक वेळ असते आणि अभ्यास करण्याची एक वेळ असते हा हा, माझे म्हणणे आहे की, काम करण्याची वेळ असते आणि पार्टी करण्याचीही एक वेळ असते, विशेषत: जेव्हा मणिकर्णिका फिल्म्सचे पहिले प्रोडक्शन होते, ते सुपरहिट ठरले, आता एका भव्य पार्टीची वेळ आली आहे.'

कंगनाने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी तिच्या लेटेस्ट लूकवर कौतुकाचा वर्षाव केला. सोशल मीडिया युजर्सचा एक भाग मात्र कंगनाला तिने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला शेअर केलेल्या भारतीय संस्कृती आणि भारतीय स्त्री बद्दलच्या तिच्या मतांची आठवण करून देण्यात गुंतला होता. नेटिझन्सनी कंगनाला तिच्या या दुटप्पीपाणासाठी बोल लावले आणि तिला ढोंगीदेखील म्हटले.

कंगनाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले, 'परत ही म्हणणार की मी भारतात फक्त भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालते. हिपोक्रसीची ही हाईट आहे'. तर दुसऱ्याने लिहिले, 'ओ भारतीय नारी विदेशी हो गयी'. तर काहींनी टिकू वेड्स शेरूच्या हिट स्टेटसचीही खिल्ली उडवली. कंगनाच्या पोस्टवर कमेंट करताना, एका युजरने लिहिले की, 'तुम्ही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले असते तर धाकड, थलायवी इत्यादी सारखीच अवस्था झाली असती. ओटीटी तुमचे बुडणारे करिअर वाचवत आहे.... ओटीटीवर वर काहीही सुपरहिट असते'. दरम्यान आणखी एकाने आवाज दिला, 'सॉरी टू से, पण तो एक भयानक चित्रपट आहे.'

कंगना आगामी इमर्जन्सी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात काम करत असताना तिने याचे दिग्दर्शनही केले आहे. कंगनाने अलीकडेच एका चित्रपटासाठी संदीप सिंगसोबत हातमिळवणी केली जी तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -

१.Vicky Kaushal Thick Beard : विकी कौशलचा पूर्ण दाढी वाढवलेला लूक, चाहते म्हणतात, 'दाढी में है जोश'

२.11 Bollywood Couples : वयातील धक्कादायक अंतर असलेली ११ बॉलीवूड जोडपी

३.Parineeti and Raghav potted : परिणीती आणि राघव चढ्ढा अमृतसर विमानतळावर दाखल, जोडपे श्री हरमंदिर साहिबला देणार भेट

ABOUT THE AUTHOR

...view details