मुंबई - Kangana Ranaut :बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तेजस' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'तेजस' हा चित्रपट 27 ऑक्टोबरला रुपेरी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे. सध्या 'तेजस'ची गणना कंगना राणौतच्या फ्लॉप चित्रपटांमध्ये केली जात आहे. कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी 'तेजस' चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते. आता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'तेजस' हा चित्रपट पाहिला आहे. मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत चित्रपट पाहिल्यानंतर कंगना रणौतनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
कंगना रणौतनं शेअर केली पोस्ट : कंगना रणौतनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिनं लिहलं, आज माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्यासाठी सैनिक शहीदांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'तेजस' चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित केले. तुम्ही पहिल्या फोटोत पाहू शकता की 'तेजस'च्या शेवटच्या सीनध्ये महाराजांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यानंतर तिनं पुढं लिहलं, 'एक सैनिक क्या चाहता है' (एका सैनिकाला काय पाहिजे) पुढं तिनं लिहलं, 'आपल्या सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि त्याग पाहून महाराज इतके भावूक झाले की त्यांचे डोळे पाणावले. धन्यवाद महाराज जी, तुमच्या स्तुतीनं आणि आशीर्वादानं आम्ही धन्य झालो आहोत.'