महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kamal Haasan in Project K? : प्रभासच्या विरोधात 'प्रोजेक्ट के'मध्ये खलनायक साकारणार कमल हासन - Prabhas Project K

नाग अश्विन दिग्दर्शित प्रोजेक्ट के हा एक भव्य चित्रपट निर्माधिन आहे. या चित्रपटात प्रभाससह अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण आहेत. या चित्रपटात खलनायकासाठी कमल हासनशी संपर्क शाधण्यात आला आहे.

Etv Bharat
'प्रोजेक्ट के'मध्ये खलनायक साकारणार कमल हासन

By

Published : May 31, 2023, 1:33 PM IST

मुंबई- साऊथचा सुपरस्टार प्रभास, बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या एकत्र भूमिका असलेला प्रोजेक्ट के हा एक भव्य चित्रपट निर्माण होणार आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील नामवंत पटकथा लेखक आणि दिग्दर्शक नाग अश्विन हा चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार कमल हासन खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे खात्रीलायक रित्या समजते. मात्र, अद्याप या वृत्ताला निर्मात्यांकडून दुजोरा मिळालेला नाही. सध्या कमल हासन त्याच्या आगामी इंडियन 2 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शंकर दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षापर्यंत प्रदर्शित होऊ शकतो.

खलनायकाच्या भूमिकेसाठी कमल हासनशी संपर्क - असे म्हटले जात आहे की, सध्या कमल हसन प्रोजेक्टच्या निर्मात्यांसोबत चर्चेत आहेत. मीडियातील बातम्यांनुसार प्रोजेक्ट के या सायन्स फिक्शन चित्रपटात कमल हासनला खलनायकाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. मात्र अंतिम कराराबद्दल अद्याप काहीही समोर आलेले नाही. जर कमल हासन या चित्रपटात सामील झाले तर ते या चित्रपटाचे शुटिंग २० दिवसांत पूर्ण करतील. इतकंच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हसनला या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी 150 कोटी रुपयांची फी ऑफर करण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

नाग अश्विनचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट के चित्रपट- भव्य, कलात्मक आणि उत्कंठावर्धक आणि मनोरंजक चित्रपटाच्या निर्मितीबद्दल नाग अश्विन ओळखले जातात. अलिकडेच त्यांनी महानटी या चरित्रात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अभिनेत्री कीर्ती सुरेश यांनी भूतकाळातील अभिनेत्री सावित्रीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 2019 मध्ये, महानटी चित्रपटाने तेलुगुमधील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. नाग अश्विनला फिल्मफेअर अवॉर्ड्स साउथमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. अशा या नाग अश्विन रेड्डी यांनी एक उत्तम कथा घेऊन चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी प्रभास आणि कमल हासन हे दोन साऊथ इंडियन सुपरस्टार आणि दीपिका आणि बिग बी या बॉलिवूड सुपरस्टार एकाच चित्रपटात एकत्र आणण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details