चेन्नई- ज्येष्ठ अभिनेता कमल हसन यांना २३ नोव्हेंबर रोजी श्री रामचंद्र मेडिकल सेंटर (SRMC) मध्ये दाखल करण्यात आले आहे. अहवालानुसार, त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आल्यामुळे अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. कमल हासन यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. अलीकडेच त्यांनी हैदराबादमध्ये त्यांचे गुरू आणि दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ यांची भेट घेतली होती आणि दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कमल हासन सध्या बिग बॉसच्या तामिळ सीझन 6 च्या होस्टिंगमध्ये गुंतले आहेत. अभिनेता गेल्या सहा सीझनपासून शोचे अँकरिंग करत आहे आणि तो खूप हिट झाला आहे.