महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

kajol buys an office space : काजोलने मुंबईत खरेदी केले कोट्यावधीचे ऑफिस; जाणून घ्या किंमत... - दोन फ्लॅट खरेदी केले

अभिनेत्री काजोल मुंबईमधील ओशिवरा येथील स्पेस सिग्नेचर बिल्डिंगमध्ये प्रॉपर्टी विकत घेतली आहे. यापूर्वीदेखील तिने दोन फ्लॅट खरेदी केले होते. काजोलच्या ऑफिसच्या जागेजवळ काही नामांकित कंपन्या आहेत.

kajol
काजोल

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 11:37 AM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा चर्चेच आली आहे. आता अलीकडेच काजोलने नवीन ऑफिस खरेदी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मुंबईतील ओशिवरा येथील सिग्नेचर बिल्डिंगमध्ये काजोलने 7.6 कोटींची प्रॉपर्टी विकत घेतल्याचे बोलले जात आहे. याशिवाय याच वर्षी जुलै महिन्यात काजोलचा पती अजय देवगणने याच इमारतीत पाच फ्लॅट खरेदी केले होते. मिळालेल्या माहितीनुसार काजोल प्रॉपर्टीजचे नवीन ऑफिस स्पेस सिग्नेचर बिल्डिंगमध्ये आहे, ही जागा 194.67 स्क्वेअर मीटर आहे.

काजोलने खरेदी केली प्रॉपर्टी :काजोलच्या ऑफिसची जागेजवळ प्रोडक्शन कंपन्या साजिद नाडियादवाला, रिलायन्स एंटरटेनमेंट, अम्बुदंतिया एंटरटेनमेंट आणि बनजय एशियासह अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. काजोलची प्रॉपर्टी ही प्राईम लोकशनवर आहे. काजोलने 2023 च्या सुरुवातीला जुहूच्या अनन्या बिल्डिंगमध्ये 11.95 कोटी रुपये खर्चून दोन फ्लॅट खरेदी केले होते. हे दोन्ही फ्लॅट 2000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहेत. हे फ्लॅट काजोलच्या शिवशक्ती बंगल्याजवळ आहे. माहितीनुसार वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने ही मालमत्ता काजोल विकली आहे. काजोल आणि अजय देवगण अनेकदा प्रॉपर्टी विकत घेत असतात. दरम्यान काजोल काही दिवसापूर्वी 'लस्ट स्टोरीज २'मुळे खूप चर्चेत आली होती. या वेब सीरीजमध्ये काजोल खूप बोल्ड अंदाजात दिसली होती. 'लस्ट स्टोरीज २'साठी काजोलचे खूप कौतुक करण्यात आले होते.

काजोलचा वर्क फ्रंट : काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तिने 1992 मध्ये 'बेखुदी' चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. त्यानंतर ती शाहरुख खानसोबत 'बाजीगर' या चित्रपटात दिसली. काजोलने तिच्या फिल्मी करिअरमध्ये 'राजू चाचा' 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'करण अर्जुन' 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' अशा अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. अखेर काजोल 'लस्ट स्टोरीज २'मध्ये दिसली होती. यापूर्वी, तिने 'द ट्रायल - प्यार, कानून', 'धोका' या वेब सीरीजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले होते. याशिवाय काजोल आता ती 'सरजमीन' आणि 'दो पत्ती' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details