मुंबई -Jr NTR invite Netflix CEO: साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर हा नेहमीचं चर्चेत असतो. अलीकडेच, त्यानं नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस यांच्यासाठी भव्य जेवणाचे आयोजन केलं होतं. ज्युनियर एनटीआरनं मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी टेड सारंडोसची भेट घेतली. आता त्यांच्या भेटीची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये एनटीआर खूप खूश दिसत आहे. एनटीआरनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिलं, "तुम्हाला आणि तुमच्या टीमला दुपारच्या जेवणासाठी होस्ट करताना आनंद झाला, टेड सारंडोस आणि आम्ही एकत्र संभाषणाचा आनंद लुटला. आम्ही जेवणादरम्यान दुपार एकत्र घालवली''.
सोशल मीडियावर फोटो शेअर केले : सीईओ टेड सारंडोस यांनी मेगास्टार चिरंजीवी आणि राम चरण यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अचानक भेट दिली होती. ते आपल्या टीमसोबत होते. ज्युनियर एनटीआर देखील टेड सारंडोससाठी जेवण आयोजित करताना खूप आनंदी दिसत आहे. भेटीदरम्यानचे काही फोटो ज्युनियर एनटीआरने शेअर केले असून या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं फोटोवर कमेंट करत लिहिल, ''आता नेटफ्लिक्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळणार नक्की''. दुसऱ्या एकानं लिहिल, ''ज्युनियर एनटीआर खूप खास व्यक्ती आहे''. आणखी एकानं लिहिलं, '' फोटो खूप खास आहेत''. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.