मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. झुबिनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पायऱ्यांवरून पडल्यामुळे सिंगरच्या डोक्याला आणि बरगडीला दुखापत झाली आहे. याशिवाय त्याच्या कपाळावरही खोल जखम आहे. जुबिन नौटियाल याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोड आवाजाचा जादूगार असलेल्या झुबिनबद्दल बोलले जात आहे की, त्याच्या कोपराचे हाड तुटले आहे.
याशिवाय डोक्याला, कपाळाला आणि बरगड्याला झालेल्या जखमाही गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंगरच्या उजव्या हातावर ऑपरेशन होणार आहे. अशा परिस्थितीत उजव्या हाताचा जास्त वापर न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
नुकतेच या गायकाचे 'तू सामने' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात जुबिनसोबत श्रीलंकन गायक योहानी दिसत आहे. गाणे लाँचिंगच्या वेळीही दोघे एकत्र दिसले होते.