हैदराबाद : मंगळवारी जया पती अमिताभ बच्चन यांच्यासोबत विमानतळावर दिसल्या होत्या. आता त्यांनी धक्कादायक वक्तव्य करून इंटरनेटवर पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. त्या पुन्हा पॅप्सवर चिडताना दिसल्या. चिडतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री जया बच्चन म्हणाल्या, कृपया माझे फोटो काढू नका. तुम्हाला इंग्रजी समजत नाही? नंतर व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, ऐसे लोगो को नौकरी से निकाल देना चाहिये. ट्विटर युजर्सनी जया बच्चन यांची निंदा केली.
यूजर्स संतापून म्हणाले : पापाराझींबद्दलची त्यांचे विचार आणि विधान लोकांच्या पसंतीस उतरले नाही. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी नेटिझन्सने सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पाडला. एका यूजरने लिहिले की, तिला प्रसिद्धी देऊ नका, ती त्या लायकीची नाही. दुसर्या यूजरने अशी असभ्य कमेंट, तिने तिची प्रतिष्ठा गमावू नये, अशी कमेंट केली. तिसर्या यूजरने लिहिले, तिच्याकडे जितके लक्ष दिले जात आहे तितकी तिची किंमत नाही, कारण आपणच सामान्य जनतेने तिला आज मोठी व्यक्ती बनवली आहे.
अभिनेत्रीला पापाराझीने गर्दी करणे आवडत नाही :अभिनेत्री जया बच्चनने पापाराझींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ऑनलाइन यूजर्सला संताप आला. काही लोक म्हणाले की, ती लक्ष देण्यास पात्र नाही आणि इतरांनीदेखील तिची टिप्पणी किती अयोग्य आहे यावर प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्रीला पापाराझीने गर्दी करणे आवडत नाही. तसेत त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा पाठलाग केलेला तिला आवडत नाही. त्यामुळे अनेकदा जया बच्चन त्यांच्यावर रागावलेल्या दिसतात.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल :यापूर्वी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये जया बच्चन त्यांच्या आणि अभिषेक बच्चन यांच्याभोवती सेल्फीसाठी जमलेल्या गर्दीवर ओरडताना दिसल्या होत्या. व्हिडिओमध्ये महिला फोटोसाठी त्यांच्याकडे जाताना दिसत आहेत. त्यावेळेस जया बच्चन त्यांची शांतता गमावून बसतात आणि त्यांच्यावर ओरडतात. आप लोग छोड़ दीजिये ना? शरम नहीं आती आप लोगों को? (किमान तुम्ही लोक आम्हाला एकटे सोडता का? तुम्हाला काही लाज वाटत नाही का?) असे त्या गर्दीतून पुढे जात म्हणाल्या. काही वेळाने, त्या मागे वळून म्हणताना दिसतात, क्या कर रहें आप? शरम नहीं आती आप लोगों को? (तुम्ही काय करत आहात? लाज नाही वाटत का?). अशा गोष्टींमुळे अनेकदा जया बच्चन चर्चेत असतात.
हेही वाचा :'रूप नगर के चीते' चित्रपटाचा अनेक महोत्सवात गाजावाजा!