महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Jawan box office collection day 5: शाहरुख खान स्टारर 'जवान' 300 कोटींचा टप्पा पार करणार... - 300 कोटींचा टप्पा पार करेल

Jawan box office collection day 5: शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'जवान' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे.

Jawan box office collection day 5
जवान बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 1:33 PM IST

मुंबई - Jawan Box Office Collection day 5 : शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती स्टारर चित्रपट 'जवान' बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख आणि नयनताराची केमिस्ट्री ही खूप खास दाखविण्यात आली आहे. अ‍ॅटली यांच्या दिग्दर्शनानं चाहत्यांना चित्रपट पाहण्यास भाग पाडलं आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजच सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत चाहते अनेक रिल्स बनविताना दिसत आहे. हा चित्रपट रोजच रेकॉर्ड मोडत आहेत.

'जवान'चं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन :या चित्रपटानं जगभरात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'जवान'नं 3 दिवसात देशांतर्गत 150 कोटीहून अधिकचा व्यवसाय केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं ओपनिंग डेला 75 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 53 कोटी, तिसऱ्या दिवशी 74.5 कोटी, चौथ्या दिवशी 81 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 287.06 कोटी झालं आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या पाचव्या दिवसात आहे. 'जवान' पाचव्या दिवशी 30 कोटी कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 316.56 कोटी होईल. 2023 मध्ये पठाण आणि गदर 2 नंतर 300 कोटींचा टप्पा पार करणारा 'जवान' हा तिसरा हिंदी चित्रपट ठरणार आहे.

'जवान' चित्रपटाची स्टारकास्ट :गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट द्वारे निर्मित, 'जवान' हा शाहरुखचा अ‍ॅटलीसोबतचा पहिला चित्रपट आहे. यांची जोडी आधीच ब्लॉकबस्टर असल्याचं सिद्ध झालं आहे. अ‍ॅटली व्यतिरिक्त, या चित्रपटात साऊथमधील नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्यासोबत देखील किंग खानचा पहिला सहयोगी चित्रपट आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू देखील आहेत. याशिवाय या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि संजय दत्तनं एक छोटीशी भूमिका साकारत आहे. हा चित्रपट लवकरच 500 कोटीची बॉक्स ऑफिसवर कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा :

  1. Priyanka chopra and preity zinta : प्रिटी झिंटा आणि प्रियांका चोप्रा जोनास ब्रदर्स कॉन्सर्टमध्ये मस्ती करताना झाल्या स्पॉट...
  2. Special screening of Jawan : दिग्दर्शक अ‍ॅटलीनं देशाच्या खऱ्या 'जवान'साठी केलं स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन....
  3. G20 Summit : ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी जी20 परिषदेदरम्यान 'आरआरआर'चे केलं कौतुक...राजामौली यांनी मानले आभार

ABOUT THE AUTHOR

...view details