महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Javed Akhtar 26/11 comments in Pakistan : जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये 26/11 बाबत केलेल्या विधानामुळे वादाला तोंड

पाकिस्तानातील लाहोर येथे आयोजित फैज महोत्सवात एका सत्राला संबोधित करताना, प्रसिद्ध भारतीय कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तान २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील हल्लेखोरांना देशात मोकळे फिरू देत असल्याचा आरोप केला. भारतात आल्यावर जावेद अख्तर यांना त्यामुळे निर्माण झालेल्या खळबळीची माहिती मिळाली.

Javed Akhtar 26/11 comments in Pakistan
Javed Akhtar 26/11 comments in Pakistan

By

Published : Feb 25, 2023, 6:11 PM IST

मुंबई- 26/11 च्या हल्ल्यांबद्दलच्या त्यांच्या भूमिकेबद्दलच्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, गीतकार-लेखक जावेद अख्तर म्हणाले की, त्यांच्या अलीकडील पाकिस्तान दौऱ्यात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांवरील त्यांची टिप्पणी खूप मोठी झाली आहे. परंतु त्यांना तिथे असताना काही मुद्द्यांवर बाजू स्पष्ट करणे गरजेचे होते असे ते म्हणाले.

जावेद अख्तर, यांनी त्यांची प्रतिक्रिया ही किंचित वादग्रस्त आणि स्वभावाने संवेदनशील असल्याचे सांगितले. ते म्हणाले की ते पाकिस्तानमध्ये त्यांचे मन बोलण्यास घाबरत नाही. ख्यातनाम उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या सन्मानार्थ एका उत्सवासाठी गेल्या आठवड्यात पाकिस्तानात गेलेले अख्तर म्हणाले की, 'ते विधान खूप मोठे झाले आहे. हे माझ्यासाठी लाजिरवाणे आहे. आता मला वाटते की मी जे काही बोललो त्यावर आनंद व्यक्त करायची गरज नाही. जेव्हा मी येथे आलो तेव्हा मला तिसरे महायुद्ध जिंकल्यासारखे वाटले. लोकांच्या तसेच मीडियाच्या इतक्या प्रतिक्रिया आल्या की मी फोन घेणे थांबवले. 'मी असा कोणता पराक्रम केलाय, शी मला लाज वाटली. मला या गोष्टी सांगायच्या होत्या. आपण गप्प बसायचं का?,' असे एका टीव्ही वाहिनीच्या मुलाखतीत आयडियाज ऑफ इंडिया 2023 समिटमधील एका सत्रादरम्यान गीतकार जावेद अख्तर म्हणाले.

लेखक-कवी अख्तर म्हणाले की त्यांना आता कळले आहे की त्यांच्या कमेंटमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. 'तिथे काही लोक मला शिव्या शाप देताहेत हे मला समजले. ते विचारत आहेत, 'त्याला व्हिसा का दिला? असेही म्हणताहेत. आता मला फक्त ते कोणते ठिकाण होते ते लक्षात राहिले आहे. मी ज्या देशात जन्मलो, मी राहतो आणि जिथे मी मरणार त्या देशात थोड्या वादग्रस्त आणि संवेदनशील अशा गोष्टी सांगत आलो आहे, मग तिथे काय घाबरायचे? इथे भीती वाटत नाही, मग मला तिथे कशाला भीती वाटेल?'

भारताने सीमेपलीकडून ज्याप्रकारे प्रतिभेचे स्वागत केले त्याप्रमाणे पाकिस्तान भारतीय कलाकारांचे स्वागत करत नाही याबद्दलही गीतकार-कवी जावेद अख्तर बोलले होते. एका क्षणी, अख्तर म्हणाले की त्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल कारण तो प्रेक्षकांकडून आला होता. ते म्हणाले की, 'एका मोठ्या हॉलमध्ये प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान... ते खूप मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ प्रश्न विचारत होते. ते छान चालले होते पण कोणीतरी मला विचारले की ते आम्हाला खूप छान पध्तीने भेटतात पण त्यांना आमच्याकडून तेवढी आपुलकी मिळत नाही. उत्तर न देता तिथून निसटण्यासाठी जागा कमी होती, म्हणून मी तसे केले आणि तेही शक्य तितक्या सभ्य पद्धतीने. मी त्यांना त्यांचे वगाणे नीट ठेवण्यास सांगितले,' असे ते म्हणाले.

अख्तर म्हणाले की, 'तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भारताने महान गझल मेहदी हसन यांचे आयोजन केले होते आणि उर्दु कवी फैज अहमद फैज यांनीही देशाला भेट दिली होती. पण पाकिस्तानने लता मंगेशकरांना कधीच होस्ट केले नाही.'

'खरं म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे की आपल्याला माहिती नाही की पाकिस्तानचा एक मोठा भाग असा आहे ज्यांना भारताशी चांगले संबंध ठेवायचे आहेत आणि ते पूर्णपणे समजण्यासारखे आहे. ते आपल्या शेजारचा एक देश पाहत आहेत ज्याने इतका विकास, कॉर्पोरेट्स, संस्कृती, चित्रपट, संगीत, उद्योग पाहिले आहेत. त्यामुळे साहजिकच, एक सामान्य नागरिक उत्सुक आहेत आणि त्यांना स्वतः येऊन याचा साक्षीदार व्हायला आवडणारे,' असेही ते म्हणाले.

जावेद अख्तर असेही म्हणाले की, प्रत्येक पाकिस्तानी हा पाकिस्तानी सैन्य, धर्मांध आणि त्याच्या आस्थापनांसोबत क्लब करणे शहाणपणाचे नाही. 'ते करणे शहाणपणाचे नाही. त्यांना अधिक विश्वासार्हता मिळेल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. मी गेलो तेव्हा तरुण, विद्यार्थ्यांकडून मला ज्या प्रकारचे स्वागत मिळाले ते अविश्वसनीय होते. जर मी म्हटले की सर्व पाकिस्तानी सारखेच आहेत, तर ते योग्य होणार नाही, असे जावेद अख्तर म्हणाले.

हेही वाचा -Urvashi Rautela Birthday : उर्वशीच्या वाढदिवसानिमित्त आई मीरा रौतेलाने दिल्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details