महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूरनं श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यू आणि कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबद्दल केला खुलासा - sridevi

Janhvi Kapoor in KWK 8: अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी 'कॉफी विथ करण सीझन 8' च्या 11 व्या भागात हजेरी लावली. यावेळी जान्हवीनं आई श्रीदेवीच्या मृत्यूबाबत खुलासा केला.

Janhvi Kapoor in KWK 8
कॉफी विथ करण सीझन 8मध्ये जान्हवी कपूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 1:12 PM IST

मुंबई - Janhvi Kapoor in KWK 8: हिंदी चित्रपटसृष्टीतल्या कपूर भगिनी जान्हवी आणि खुशी कपूर या चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण सीझन 8' च्या 11 व्या भागात आल्या. या शोदरम्यान जान्हवी आणि खुशीनं खूप एन्जॉय केला. याशिवाय यावेळी त्यांना दुःखाचे काही क्षणही आठवले. एकीकडे जान्हवी कपूरनं तिच्या नात्याबद्दल मोकळेपणानं बोलली, तर दुसरीकडे तिची दिवंगत आई श्रीदेवी हिच्या निधनावर तिनं काही खुलासे देखील केले. 2018 मध्ये श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले. दुबईत लग्नासाठी संपूर्ण कुटुंब येथे गेलं होतं. श्रीदेवीचा आकस्मिक मृत्यू जान्हवी आणि तिच्या कुटुंबीयांसाठी खूप धक्कादायक होता.

श्रीदेवीच्या निधनाबद्दल जान्हवी कपूरनं केला खुलासा : बोनी कपूर आजही पत्नीची आठवण काढतात आणि भावूक होतात. श्रीदेवीच्या निधनाला पाच वर्ष झाली आहेत. आता पाच वर्षांनी जान्हवीनं तिच्या आईबद्दल बोलण्याचं धाडस केला आहे. जान्हवीनं शोमध्ये सांगितलं की, जेव्हा तिच्या आईच्या निधनाची बातमी फोनद्वारे तिच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा तिला खुशीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. जान्हवीने पुढं सांगितलं की, ''त्यावेळी मी सुद्धा घाबरत रडत तिच्या खोलीत गेले, पण मला पाहताच तिनं रडायचं थांबवलं. ती माझ्या शेजारी बसली आणि मला शांत करू लागली. यापूर्वी मी तिला कधीच रडताना पाहिलं नव्हतं.'' यावर खुशी म्हणते, ''मला असं वाटलं की सर्वांना सांभाळायचे आहे त्यामुळं मी शांत झाले, कारण मी नेहमीच खंबीर राहिली आहे." त्यानंतर जान्हवीनं सांगितलं की, "खुशी तिच्या आईसारखी आहे, ती पडद्याआड पूर्णपणे शांत राहते आणि कॅमेरावर गोंधळ निर्माण करते."

शिखर पहाडिया-जान्हवी कपूरच्या नात्याचा खुलासा :'कॉफी विथ करण सीझन 8' चा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला जान्हवी कपूर म्हणते, "काल रात्री पार्टीमध्ये मी लोकांना रॅपिड फायर राउंडबद्दल प्रश्न विचारत होते. तर नव्या नवेली नंदा म्हणाली की, जाऊ नकोस.'" त्यानंतर क्लिपमध्ये, करण जान्हवीला तिच्या स्पीड डायलवर तीन लोकांची नावं कोणाची आहे हा प्रश्न विचारतो. यावर ती उत्तर देते की, 'पापा, खुशू आणि शिकू.' जान्हवीला लगेच समजतं की तिनं बोलण्याच्या ओघात बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचं नाव घेतलं आहे. यावर खुशी कपूर आणि करण जोहर जोरजोरात हसायला लागतात. त्यानंतर करण जान्हवीला तिच्या पूर्वीच्या नात्यांबद्दल विचारतो. यावर ती म्हणते की, ''मी फक्त तीन मुलांना डेट केलं आहे.'' जान्हवी ही शिखर पहाडियाला डेट करत असल्याची आता पुष्टी झाली आहे.

हेही वाचा :

  1. आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानचा विवाह मोठ्या थाटामाटात पडला पार
  2. अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात चोरी; सहा लाखाचे दागिने गेले चोरीला, आरोपीला अटक
  3. आमिरच्या जावयाची लग्नासाठी हटके एंट्री, आला जिम ट्रेनरच्या वेशात! व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details