मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामना पाहण्यासाठी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पोहोचली होती. जॅकलीनचे स्टेडियममधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचवेळी जॅकलिनने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर मॅचदरम्यानचे काही खास फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आयपीएल च्या 56 व्या सामन्यात जॅकलीन फर्नांडिस केकेआर (KKR) ला चिअर करण्यासाठी आली होती.
ईडन गार्डन्सवर आनंद लुटतांना जॅकलीन : जॅकलिन फर्नांडिस ईडन गार्डन्सच्या स्टँडवरून एकतर्फी सामन्याचा आनंद घेताना दिसली. सामना संपल्यानंतर तिने स्टेडियममधील तिचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले. कॅप्शनसह पोस्ट केले, तिने लिहले की, 'हा सर्वोत्तम अनुभव होता. केकेआर विरूद्ध राजस्थान रॉयल्स तुम्हाला थेट खेळताना पाहणे फार आश्चर्यकारक होते. जॅकलिनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर ट्रोलर्सनी तिला टार्गेट केले आणि तिला प्रचंड ट्रोल केले. केकेआरच्या पराभवाचे कारण अभिनेत्रीला सांगितले आहे. जॅकलिनच्या पोस्टवर एका यूजरने लिहिले आहे की, 'आता मला समजले की कोलकाता (KKR) इतका वाईट का हरला'.