हैदराबाद :भारतासाठी ऑस्कर्स पुरस्कार सोहळ्यातून आनंदाची बातमी आली आहे.गुनीत मोंगा निर्मित कार्तिकी गोन्साल्विस यांचा लघुपट 'द एलिफंट व्हिस्परर्स'ने सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी 95 वा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. द एलिफंट व्हिस्परर्स ही नेटफ्लिक्सची निर्मिती आहे आणि ती बोमन आणि बेली नावाच्या स्थानिक जोडप्याची कथा सांगते ज्यांना रघु नावाच्या अनाथ हत्तीच्या बाळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मानव आणि प्राणी यांच्यातील संबंधांवर आधारित : या डॉक्युमेंट्रीला बनण्यासाठी 5 वर्षे लागली जिचा एकूण रनटाइम 450 तासांचा आहे. ही डॉक्युमेंट्री मानव आणि पॅचीडर्म्स यांच्यातील प्रेमाच्या गुंतागुंतीवर आधारित आहे. या डॉक्युमेंट्रीतील दृष्ये जंगलाच्या सौंदर्याने दर्शकांना मोहित करते. कार्तिकी गोन्साल्विस यांनी या डॉक्युमेंट्री द्वारे मानव आणि प्राणी यांच्यातील संबंध या विषयाला स्पर्श केला आहे. औद्योगीकरणामुळे मानव अनेकदा प्राण्यांच्या हक्काच्या जंगलाच्या प्रदेशांवर अतिक्रमण करतात. 'द एलिफंट व्हिस्परर्स' ही अशा लोकांची कथा आहे, जे पिढ्यानपिढ्या हत्तींसोबत काम करत आहेत आणि त्यांना जंगलाच्या गरजांची जाणीव आहे, असे निर्मात्यांनी सांगितले. यापूर्वी देखील 'पीरियड' या डॉक्युमेंट्रीच्या निर्मीतीसाठी मोंगा यांना गौरवण्यात आले आहे. या डॉक्युमेंट्रीने सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी 2019 चा अकादमी पुरस्कार जिंकला होता.