महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Aamir Khans next production : 'वन डे' फिल्मच्या रिमेकमध्ये झळकणार आमिरचा मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूर? - जुनैद खान आणि खुशी कपूर

आमिरचा मुलगा जुनैद खान महाराजा या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. हा एक ऐतिहासिक विषयावरील चित्रपट असेल. दरम्यान आमिरने त्याच्यासाठी थाई चित्रपट वन डे चे हक्क विकत घेतले असून याच्या रिमेकमध्ये तो जुनैदला संधी देणार आहे.

Aamir Khans next production
आमिरचा मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूर

By

Published : Aug 16, 2023, 7:04 PM IST

मुंबई- 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने अद्याप त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली नाही. दरम्यान, आमिरचा मुलगा जुनैद खान अभिनयाच्या क्षेत्रात आमिरसोबत उतरणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आमिरच्या या अद्याप घोषणा न झालेल्या चित्रपटात श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक थाई चित्रपटाचा हिंदी रिमेक असू शकतो.

आमिरचा मुलगा जुनैद खान हा 'महाराजा' या यशराज फिल्म्सच्या चित्रपटात अभिनय साकारणार आहे. हा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला नाट्यमय चित्रपट आहे. त्याचा हा पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याला वडील आमिर खानच्या चित्रपटातही संधी मिळणार आहे. त्याचा हा आगामी चित्रपट 'वन डे' या थाई चित्रपटाचा अधिकृत रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमिरने या चित्रपटाचे रिमेक अधिकार आधीच विकत घेतले आहेत ज्याचे दिग्दर्शन त्याचा एक जवळचा सहकारी सुनील पांडे करणार आहे. जुनैद खान आणि खुशी कपूर या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत.

'लाल सिंग चड्ढा'नतर आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. आगामी काळात तो कोणताही नवा प्रोजेक्ट साईन करणार नाही यावर अद्यापही ठाम आहे. दरम्यान मुलगा जुनैद खानसाठी चित्रपट निर्मिती करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. जुनैदच्या व्यक्तीमत्वाला शोभेल अशी भूमिका त्याला 'वन डे' हा चित्रपट पाहून वाटली आणि याचा हिंदी रिमेक तो बनवणार आहे.

दरम्यान, खुशी तिचा पहिला चित्रपट 'द आर्चीज'च्या रिलीजसाठी तयारी करत आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असला तरी नेटफ्लिक्सने अद्याप त्याचा रिलीजची तारीख निश्चित केलेली नाही. दुसरीकडे, जुनैदने महाराजा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून त्यात जयदीप अहलावत आणि शर्वरी वाघ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तमिळ रॉम-कॉम 'लव्ह टुडे'च्या हिंदी रीमेकसाठी जुनैदशी संपर्क केला जात असल्याच्या बातम्या यापूर्वी डिजीटल माध्यमात झळकल्या होत्या. पण अद्याप त्याची घोषणा झालेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details