मुंबई - Ira Khan-Nupur Shikhare Wedding:अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे सध्या त्यांच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. या जोडप्याचं लग्न 3 जानेवारीला मुंबईत नोंदणीकृत झालं. या लग्न सोहळ्यात कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित होते. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान आयरा खाननं तिचा भाऊ जुनैद खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो मुंबईतील लग्न सोहळ्याचा आहे. या फोटोमध्ये ती आणि तिचा भाऊ जुनैद खान फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.
आयरा आणि नुपूरचं लग्न :आयरा खाननं हा फोटो शेअर करताना लिहिलं, ''शेवटी आम्ही एकत्र फोटो काढला.'' याशिवाय आयरानं आणखी काही फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले आहेत. पहिल्या एका फोटोंमध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत खूप आनंदी दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या एका पोस्टमध्ये आमिर खान आणि नुपूरच्या कुटुंबातील काही सदस्य डान्स करताना दिसत आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये नुपूर हा गाताना दिसत आहे. यानंतर तिनं काही फोटो तिची पोस्ट केली आहेत. याशिवाय इतर फोटोमध्ये आयरा आणि नुपूर कॅमेऱ्यासमोर रोमँटिक पोझ देताना दिसत आहेत. याशिवाय शेअर केलेल्या एका फोटोमध्ये इमरान खान आणि त्याची कथित असलेली गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनसोबत दिसत आहे.