कान्स (फ्रान्स): कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 अगदी जवळ आला आहे. शिवाय भारतीय सिनेमा आधीच जबरदस्त कामगिरी करतांना दिसत आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हल महोत्सवात दिग्दर्शक अनुराग कश्यपचा 'केनेडी' आणि अभिनेता राहुल रॉयचा आग्रा यासह अनेक भारतीय चित्रपट दाखवले जातील. 16 ते 27 मे रोजी होणाऱ्या या फेस्टिव्हलच्या मिडनाईट स्क्रिनिंग विभागाचा भाग म्हणून अनुराग कश्यपच्या केनेडी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये, कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या अधिकृत ट्विटर हँडलने महोत्सवाच्या मिडनाईट स्क्रीनिंग विभागात अनुराग कश्यपच्या 'केनेडी' या चित्रपटाची निवड जाहीर केली.
मिडनाईट स्क्रीनिंग :'केनेडी' या चित्रपटात सनी लिओन, राहुल भट्ट आणि अभिलाष थापलियाल या कलाकारांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कहाणी , एका निद्रानाश माजी पोलिसाविषयी आहे जो वेगवेगळ्या परिस्थितीत राहतो आणि विमोचन शोधत असतो. हा असा माजी पोलीस असतो, की,ज्याला बर्याच काळापासून मृत मानले जाते, तो भ्रष्ट व्यवस्थेसाठी गुप्तपणे काम करत असतो. झी स्टुडिओ आणि गुड बॅड फिल्म्स निर्मित हा चित्रपट आहे, 'केनेडी' या चित्रपटात राहुल भटने माजी पोलिसाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कहाणी ही एका निद्रानाश झालेल्या माजी पोलिसाभोवती फिरणारी आहे.या चित्रपटाबद्दल तपशील शेअर करताना, कश्यप म्हणाले, 'हा चित्रपट एका वेगळ्या शैली आहे. ज्याचा मला नेहमीच शोध घ्यायचा होता हा चित्रपट असा बनला आहे .पॅट्रिक मॅन्चेटच्या गुन्हेगारी लेखन आणि जॅक टार्डी यांच्या कॉमिक बुकच्या सहकार्याने आणि मेलव्हिलच्या सिनेमातून प्रेरित असलेला हा चित्रपट आहे. तसेच एक अतिशय वैयक्तिक गुन्हा, पोलिसाची कहानी आहे. 'मी टीमचा खूप आभारी आहे ज्यांनी चित्रपटाला घडविण्यास माझी मदत केली. राहुल भटने आपल्या आयुष्यातील 8 महिने दिले आणि सनी लिओन मोहित करणारी भूमिका साकारली याबद्दल मी आभारी आहे.