मुंबई :शाहरुख खान सध्या आगामी चित्रपट 'जवान'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे तो एक नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चालला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विजयाचे झेंडे रोवले होते. हा चित्रपट भारतात हिंदी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा ठरला. दरम्यान आता किंग खान हा रूपेरी पडद्यावर 'जवान' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांवर जादू करायला येत आहे. 'जवान' चित्रपटाच्या रिलीजसाठी काही दिवसच शिल्लक आहे. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांच्या डोक्यामध्ये भिनत चालली आहे.
'जवान' चित्रपटाचा शो सकाळी 6 वाजता दिसणार : 'जवान'मध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, दीपिका पदुकोण आणि सान्या मल्होत्रा हे देखील कलाकर दिसणार आहेत. दरम्यान आता 'जवान' चित्रपटाबाबत एक बातमी समोर येत आहे. मुंबईतील आयकॉनिक गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये सकाळी 6 वाजता 'जवान'चे स्क्रिनिंग आयोजित करणार आहे. आता या बातमीमुळे किंग खानच्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. शाहरुखच्या युनिव्हर्स फॅन क्लबच्या मते, मुंबईत सर्वाधिक मागणी असलेल्या थिएटरमध्ये हा शो आयोजित करण्यात येणार आहे. 'जवान' हा चित्रपट सर्वांधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण १००० रुपयांचे तिकिट काढयला देखील तयार आहेत. यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये देखील मुंबईमधील सर्व शो हाऊसफुल झाले होते.