महाराष्ट्र

maharashtra

IAS Abhishek Singh Album : माजी आयएएस अभिषेक सिंग सनी लिओनीसोबत करणार रोमान्स; व्हिडिओ व्हायरल...

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 6:53 PM IST

IAS Abhishek Singh Album : यूपीचा प्रसिद्ध माजी आयएएस अधिकारी अभिषेक सिंग यांनी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर सनी लिओनीसोबत एक रॅप गाण्यात दिसणार आहे. त्यांच हे गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत बेबी डॉल सनी दिसत आहे.

IAS Abhishek Singh Album
आयएएस अभिषेक सिंग अल्बम

IAS Abhishek Singh Album : यूपीचे प्रसिद्ध आयएएस (IAS) अधिकारी अभिषेक सिंग यांनी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर आता ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला आहे. ते लवकरच एकेकाळची पोर्नस्टार आणि सध्याची हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सनी लिओनीसोबत एक रॅप गाण्यात दिसणार आहे. हे गाणं लवकरच रिलीज होणार आहे. या गाण्याचं व्हिडिओ शूटिंगही पूर्ण झालं असून याबद्दलची माहिती अभिषेक सिंग यांनी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्यासोबत सनी लिओनही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक एका वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी जौनपूरच्या लोकांना नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यासह लवकरच जौनपूरला सनी लियोन येईल हे देखील त्यांनी सांगितलं आहे.

माजी अधिकारी अभिषेक सिंग आणि सनी लिओचा व्हिडिओ : माजी आयएएस अधिकारी अभिषेक सिंग यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, 'जौनपूरच्या माझ्या बंधू, बहिणी आणि वडिलधाऱ्यांना, आजचा दिवस खूप शुभ आहे. आम्ही नुकतेच आमच्या रॅप व्हिडिओचे शूटिंग पूर्ण केले आहे, जे मी स्वतः गायले आहे. या गाण्यात सनीच्या उपस्थितीनं ग्लॅमर वाढलं असून या गाण्यात एक चैतन्य आलं आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे गाणे आवडेल'. अभिषेक सिंग यांना अभिनय आणि गायन खूप आवडते, त्यामुळं त्यांनी अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक याआधीही गायक बी पारक यांच्या गाण्यात दिसले होते.

आयएएसचा राजीनामा देऊन उचलले पाऊल :आयएएस अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अभिषेक सिंग आता बॉलिवूडमध्ये आपलं करिअर घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. नुकताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यापूर्वी फेब्रुवारी 2023 पासून ते निलंबित होते. माजी आयएएस अभिषेक सिंग गुजरातमध्ये निरीक्षक म्हणून नियुक्त केले गेले होते. त्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी त्यांच्या सरकारी वाहनासमोर फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला होता, त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर त्यांना महसूल विभाग दिला. परंतु त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांची पत्नी दुर्गा शक्ती नागपाल या देखील आयएएस अधिकारी आहेत.

हेही वाचा :

  1. Battalion 50 : 'बटालियन 50'मधून दिसणार सीमेवरील शूरवीरांची गाथा; लवकरच मोठ्या पडद्यावर होणार प्रदर्शित....
  2. Junaid Khans debut film shoot wrapped : आमिरचा मुलगा जुनैद खानच्या पहिल्या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण, शालिनी पांडेनं सांगितला सेटवरील अनुभव
  3. Thalaivar 170 : 'थलैवर 170'मध्ये दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि रजनीकांत 33 वर्षांनंतर दिसणार एकत्र...

ABOUT THE AUTHOR

...view details