मुंबई- Salaar got an A certificate from the Censor Board : प्रभासच्या आगामी अॅक्शन ड्रामा 'सालार' चित्रपटाला (CBFC) कडून 'ए' प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रभासचा चाहता वर्ग 18 वर्षा खालील मुलांमध्ये मोठा असल्याने त्यांना हा निर्णय आवडणारा नाही. खरंतर सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांचे पालन करून चित्रपट निर्मात्यांना U/A प्रमाणपत्र मिळू शकले असते. परंतु चित्रपटाचा दिग्दर्शक प्रशांत नीलने नमूद केले की, सीन्सवर कात्री चालवली तर कथानकावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
एसएस राजामौली यांच्याशी भेटीमध्ये टीम 'सालार' चित्रपटाच्या टीमने निर्मितीतील यापूर्वी कधीही शेअर न केलेले किस्से उघड केले. मुलाखतीदरम्यान, एसएस राजामौली यांनी सालारला 'ए' प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल प्रशांत नीलचे म्हणणे विचारले. आपले मत व्यक्त करताना प्रशांतने सांगितले की, "चित्रपट हिंसक बनवून त्याला 'ए' प्रमाणपत्र मिळवण्याचा कोणताही हेतु समोर ठेवला नव्हता."
चित्रपट निर्मात्याने स्पष्ट केले की गेल्या 30 वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये प्रभास लोकप्रिय आहे. आजवरच्या त्याने केलेल्या अॅक्शनला प्रेक्षकांनी पसंत केले आहे. त्यामुळे त्याचा दर्जा आणखी उंचावण्याचे ध्येय समोर ठेवून 'सालार' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सांगितले की चित्रपटाला 'U/A' प्रमाणपत्र मिळावे यासाठी सेन्सॉर बोर्डाने खूप सीन्सवर कात्री चालवण्यास सांगितले होते. त्यातील काही सीन्स कमी करण्याची तयारी होती मात्र काही सीन्स आवश्यक होते. हे सीन्स काढले तर चित्रपटाच्या कथेशी तडजोड झाली असती. प्रमाणपत्रावर विचार करताना, प्रशांत नीला म्हणाले, "मी खूप निराश झालो. मी जवळजवळ 15-20 मिनिटे शांतपणे बसलो कारण मला माहित आहे की मी हिंसाचारासह अश्लील किंवा असंवेदनशील चित्रपट बनवलेला नाही. ही सर्व आवश्यक हिंसा 'सालार'मध्ये एकत्रित केली आहे."