मुंबई - हुमा कुरेशी हिची प्रमुख भूमिका असलेल्या तरला चित्रपट आता थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. भारताची प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांना भेटणार आहे. झी ५ या ओटीटीवर तरला प्रवाहित होणार आहे. मात्र याचे प्रदर्शन कधीपासून सुू हगोईल याची माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
शेफ तरला दलाल बायोपिक - तरला दलाल या मुख्यतः एक आचारी आहेत, त्यासोबतच त्या फूड रायटर आणि गुजराती खाद्यपदार्थाच्या तज्ञ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी तरला दलाल शो आणि कुक इट अप विथ तरला सारखे शो देखील होस्ट केले. शेफ तरला दलाल यांना 2007 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. हुमा कुरेशी या चित्रपटांमध्ये तरला याची भूमिका साकारुन आपले अभिनय कौशल्य दाखवणार आहे.
तरला चित्रपटाची निर्मिती- हा चित्रपट पियुष गुप्ता यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच रॉनी स्क्रूवाला, अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी हे तरला चित्रपटाचे निर्माते आहेत. हुमाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर 'पूजा मेरी जान' या वर्षी प्रदर्शित होणार आहे, यामध्ये हुमा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सनी सिंग आणि सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याआधी हुमा कुरेशी हिने राजकुमार रावसोबत 'मोनिका ओ माय डार्लिंग' आणि सोनाक्षी सिन्हासोबत 'डबल एक्सेल'मध्ये काम केले होते.
झी५ वर प्रदर्शित होणारे चित्रपट - झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार्या 'सनफ्लॉवर सीझन 2', 'आम आदमी फॅमिली सीझन 4', 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' सारख्या मूळ मालिकांचे सिक्वेल लाइनअपमध्ये आहेत. यासोबतच मनोज बाजपेयीचा 'सिर्फ एक बंदा काफी है' आणि 'सायलेन्स 2', पंकज त्रिपाठीचा 'कडक सिंह', सनी देओलचा 'गदर 2' हे सिनेमे थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.
हेही वाचा -Navya Naveli Nanda Drives A Tractor : गावात ट्रॅक्टर चालवतांना बिग बींची नात नव्या नवेली नंदा