मुंबई - FIGHTER TEASER :अभिनेता हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर स्टारर एरियल अॅक्शन चित्रपट 'फायटर'चा टीझर लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारतातील ही पहिली एरियल अॅक्शन फ्रँचायझी असल्याचं बोललं जात आहे. 'फायटर'मधील हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले असून आता या चित्रपटाच्या टीझर रिलीज डेटही समोर आली आहे. 'फाइटर' बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर उद्या 8 डिसेंबर रोजी 11 वाजता प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
'फायटर' चित्रपटाबद्दल :या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी 'बँग बँग' आणि 'वॉर' या चित्रपटाचं निर्मित केली आहे. 'फायटर' हा हृतिक रोशनचा पहिला थ्रीडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनं एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, ''फायटर' चित्रपटाचा टीझर लोड होत आहे आणि तो कधी प्रदर्शित होणार याचीही माहिती यामध्ये दिली आहे''. 'फायटर' चित्रपटाचा टीझर लोड होत असलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर कमेंट करत म्हटलं, ''हा चित्रपट खूप जबरदस्त असणार आहे, मी खूप आतुरतेनं वाट पाहत आहे''. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं, ''हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचे अॅक्शन सीन पाहायला खूप मजा येईल''. याशिवाय आणखी एकानं लिहिलं, ''हा चित्रपट लवकरच रिलीज करा आता मी वाट पाहू शकत नाही''. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजणांनी या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.