मुंबई - Hindi Diwas 2024 :आज देशभरात हिंदी दिवस साजरा केला जात आहे. हिंदी ही भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून देशभरात या भाषेचा आदर केला जातो. हिंदी भाषा ही प्रत्येकजणांना आता आकर्षित करत आहे. परदेशातील लोक देखील ही भाषा शिकत असल्याचं दिसून येतं. देशात प्रत्येक ठिकाणी ही भाषा समजली आणि बोलली जाते. या भाषेत आपण सोप्या पद्धतीनं संवाद साधू शकतो. हिंदी चित्रपटसृष्टीत हिंदीचा प्रचार करणारे आणि या भाषेची क्षमता दाखवणारे चित्रपट फार कमी आहेत. या यादीमध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटांपासून ते दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानपर्यंतच्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. आज हिंदी दिनानिमित्त आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल आम्ही सांगणार आहोत.
'नमस्ते लंडन' : अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'नमस्ते लंडन'मध्ये भारतीय सभ्यतेसोबतच हिंदीचे महत्त्वही चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. हा चित्रपट 2007 रोजी रिलीज झाला होता. विपुल अमृतलाल शाह यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यात ऋषी कपूर, अक्षय कुमार, कतरिना कैफ, नीना वाडिया, जावेद शेख, उपेन पटेल आणि क्लाइव्ह स्टँडन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट खऱ्या आयुष्यावर आधारित आहे.
'हिंदी मीडियम' :दिवंगत बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा सुपरहिट चित्रपट 'हिंदी मीडियम'च्या नावाला हिंदी हा शब्द जोडण्यात आला आहे. या चित्रपटाची कहाणी दिल्लीत राहणारा उद्योगपती राज बत्राची आहे, जो श्रीमंत आहे पण त्याला इंग्रजी बोलता येत नाही, त्यामुळे त्याच्या मुलीनं इंग्रजी शाळेत शिकावे अशी त्याची इच्छा असते. त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. या चित्रपटामध्ये इरफान खान व्यतिरिक्त सबा कमर, दीपक डोबरियाल, तिलोत्तमा शोम, दिशिता सहगल, अमृता सिंग, क्रिशन कुमार, संजय सूरी, संजना सांघी, राजेश शर्मा, नीलू कोहली आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन साकेत चौधरी यांनी केलं आहे. हा चित्रपट 19 मे 2019 रिलीज झाला.