महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shriya Saran with Radha : श्रिया सरनने सांगितला मुलगी राधाला फोटोसाठी पटवल्याचा किस्सा - श्रिया सरनचा आगामी चित्रपट

अभिनेत्री श्रिया सरनने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर तिची मुलगी राधाचे छान फोटो चाहत्यांसाठी शेअर केले. हे फोटो घेण्यासाठी तिने राधाला कसे तयार केले याबद्दल श्रियाने सांगितले.

Shriya Saran with Radha
राधा आणि श्रियाचा फोटो

By

Published : May 9, 2023, 1:23 PM IST

मुंबई - अभिनेत्री श्रिया सरनने सोमवारी तिची मुलगी राधासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या इन्स्टाग्रामवर श्रियाने तिच्या चाहत्यांसाठी फोटोंची स्ट्रिंग शेअर केली. मुलीसोबत परफेक्ट फोटो घेण्यासाठी तिने काय केले याबद्दलही तिने सांगितले. श्रियाने लिहिले, 'राधा म्हणते, मम्मा नो शुटिंग प्लिज, मला पुस्तक दे...मला वाचून झोपायचंय. मी तिला म्हटले, 'राधा प्लिज फोटोसाठी ये...' ओके मम्मा. मग तिने मला आय लव्ह यू म्हटले. माझे काळीज प्रेमासह माझ्या राधासोबत आहे.'

राधा आणि श्रियाचा फोटो- पहिल्या फोटोत श्रिया छोट्या राधाला हातात धरून ठेवते तर आई-मुलगी कॅमेऱ्यासाठी पोज देतात. पांढर्‍या पोशाखात राधा तिच्या आईच्या कुशीमध्ये आनंदाने विसावते आणि श्रिया फोटोला पोज देते. दुसऱ्या फोटोत श्रिय सरन हिने तिच्या पूर्ण पोशाखातील एक लूक दिला. काळ्या ब्रॅलेट टॉप आणि थाय हाय स्लिटसह मॅचिंग पेन्सिल स्कर्टमध्ये ती जबरदस्त दिसत होती. श्रियाने फुललेल्या पांढऱ्या स्लीव्ह्जचा पर्याय निवडला होता.

श्रिया सरनचा आगामी चित्रपट - अभिनेत्री श्रिया सरनने 2018 मध्ये रशियन टेनिस खेळाडू आणि उद्योजक आंद्रेई कोस्चीवशी लग्न केले. तो मूळचा बार्सिलोना, स्पेनचा आहे. त्या वर्षी ऑगस्टमध्ये ती स्पेनमधून भारतात परतली, तेव्हापासून तिच्या गर्भधारणेच्या अफवा पसरल्या होत्या. आपल्या पोस्टद्वारे श्रियाने या अफवांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीच्या जन्माची थेट बातमीच देऊन चाहत्यांना चकित केले होते. त्यांनी 2020 मध्ये त्यांच्या पहिल्या जन्मलेल्या मुलीचे स्वागत केले. त्यांनी लग्न केल्यानंतर एक वर्षाने ही माहिती जगाला दिली होती. श्रिया नेहमी सोशल मीडियावर राधासोबतच्या तिच्या काळातील आकर्षक लुकही शेअर करत असते. दरम्यान, श्रिया सरन म्युझिक स्कूलमध्ये दिसणार आहे. हा एक तेलगू-हिंदी म्यूझिकल चित्रपट असेल. यामध्ये श्रियासोबत शर्मन जोशी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पापा राव बियाला यांनी केले असून संगीत दिग्गज इलयाराजा यांनी दिले आहे.

हेही वाचा -Shekhar Kapur Dyslexic : शेखर कपूर यांना डिस्लेक्सियाचा त्रास, एआयच्या मदतीने लागली गणिताची गोडी

ABOUT THE AUTHOR

...view details