मुंबई - Bipasha Basu Birthday: अभिनेत्री बिपाशा बसू आज 7 जानेवारी रोजी तिचा 45 वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अनेक चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान बिपाशानं देखील सोशल मीडियावर एक सुंदर अशी नोट लिहिलं आहे. याशिवाय बिपाशाचा पती करण सिंग ग्रोवरनं देखील या विशेष प्रसंगी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशा बसू सध्या तिची पहिली मुलगी देवी आणि पती करण सिंग ग्रोव्हरसोबत पालकत्वाचा आनंद घेत आहे. बिपाशा नेहमीच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करत असते. दरम्यान आता तिनं एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये बिपाशा पती करणसह देवीसोबत एका सुंदर समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या तलावाच्या आत बसून एजॉय करताना दिसत आहेत.
बिपाशा बसूचा वाढदिवस : फोटोत बिपाशानं मुलीला आपल्या कडेवर पकडले आहे. याशिवाय करण सिंग ग्रोव्हरनं न पाहिलेले फोटोसह एक सुंदर अशी नोट लिहिली आहे. या फोटो बिपाशा समुद्रकिनाऱ्यावर वाळूवर मुलगी देवीसह उभी आहे. हा फोटो शेअर करताना त्यानं लिहिलं, ''गोड लहान बाळा बंबी राजकुमारी पाई तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा!. तू नेहमीच तेजस्वी प्रकाशाप्रमाणे आहेस, तुझे सर्वात सुंदर स्मित हास्य आहेस, मी सदैव तुमच्या सोबत असेन. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' बिपाशानं लगेचच त्याच्या सुंदर पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ''माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि कायमचे माझे राहिल्याबद्दल धन्यवाद, तू माझा आहेस आणि नेहमीच माझीच राहशील.''