मुंबई- Saba Azad birthday : हृतिक रोशननं त्याची गर्लफ्रेंड सबा आझादच्या 38 व्या वाढदिवशी तिला इन्स्टाग्रामवर प्रेमानं शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिकची माजी पत्नी सुझैन खाननं देखील सबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या काही महिन्यापासून हृतिक आणि सबा यांनी आपलं नातं उत्तम जपलंय. एकमेकांवरील उत्कट प्रेम ते नेहमी व्यक्त करत आलेयत.
सबा आझादच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त हृतिक रोशननं सोशल मीडियावर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. बर्थडे गर्लच्या आनंदी फोटोसह त्यांच्यातील पार्टनरशीपमध्ये जाणवणारं प्रेम, आस्था प्रेरणा व्यक्त करणारा एक हृदयस्पर्शी मेसेज लिहिलाय. तिच्या प्रेमामुळं आराम, सुरक्षितता आणि जीवनातील साहसे एकत्र स्वीकारण्याचं धैर्य मिळत असल्याचं म्हटलंय. तिच्याबरोबर राहण्यानं घरी आपल्यासारखं वाटत असल्याचं आणि तिच्यासोबतच्या प्रवासातील साधे क्षण जादुई वाटत असल्याचंही त्यानं पुढे म्हटलंय. हृतिकनं सबाकडून शिकलेले मौल्यवान धडे देखील स्वीकारले आहेत. 'माय लव्ह', म्हणत त्यानं तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
हृतिक आणि सुझैन खान यांचा प्रेमविवाह 2000 मध्ये झाला आणि त्यांनी 14 वर्षे सुखी संसार केला. त्यांना हृहान आणि हृधन ही दोन मुलं झाली, परंतु त्यांच्यातील नातं टिकलं नाही. त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय चर्चेअंती घेतला असला तरी दोघंही मुलांसाठी पालक म्हणून वेळ देतात. हृतिकनं आपल्या भविष्याचा मार्ग निवडताना जोडीदार म्हणून सबा आझादची निवड केलीय. तर सुझैनंही अभिनेता अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिप वाढवलीय.
कामाच्या आघाडीवर हृतिक रोशन 'विक्रम वेधा' या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्यानं सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याच्याकडील आगामी प्रकल्पांमध्ये 'फायटर' हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. यामध्ये तो दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्याबरोबर काम करत आहे. यानंतर 'वॉर 2' मध्ये तो जूनियर एनटीआर सोबत दिसणार आहे. हृतिकनं 'क्रिश 4' चं स्क्रिप्ट लॉक केलं आहे आणि पुढील वर्षाच्या सुरुवातील तो प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात करणार आहे.