मुंबई - Guntur Kaaram Advance Booking : साऊथ अभिनेता महेश बाबू पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धमाका करायला येत आहे. महेश बाबू स्टारर आगामी अॅक्शन ड्रामा 'गुंटूर कारम' रुपेरी पडद्यावर रिलीजसाठी सज्ज आहे. दरम्यान महेश बाबूच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. 'गुंटूर कारम' उद्या म्हणजेच 12 जानेवारीला मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रिलीज होणार आहे. महेश बाबूच्या उत्तर भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होत आहे. 'गुंटूर कारम' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल जाणून घेऊ या.
पहिल्या दिवशी चित्रपट किती करणार कलेक्शन : हा चित्रपट साऊथ सिनेसृष्टीत धमाका करणार आहे. या आठवड्यात साऊथ सिनेसृष्टीत एक नव्हे तर पाचहून अधिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. 'गुंटूर कारम' व्यतिरिक्त 'हनुमान' हा चित्रपट 12 जानेवारी, साऊथ स्टार व्यंकटेश दग्गुबतीचा 'सिंधवा' 13 जानेवारी, अभिनेता नागार्जुन स्टारर 'ना सामी रंगा' 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहेत. दरम्यान 200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'गुंटूर कारम'नं गुरुवारी 11 जानेवारी रोजी सकाळपर्यंत आगाऊ बुकिंगमध्ये 35 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं आगाऊ बुकिंगमध्ये सुमारे 18.18 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'गुंटूर कारम'नं परदेशात आगाऊ बुकिंगमध्ये 16.6 कोटीची कमाई केली आहे.
जगभरातील टॉप अॅडव्हान्स बुकिंग
सालार – 81 कोटी
आदिपुरुष – 45 कोटी