मुंबई - अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका असलेला आगामी कौटुंबिक मनोरंजन चित्रपट गुडबायचे निर्माते यांनी मंगळवारी चित्रपटाच्या ट्रेलरचा लॉन्च केला. गुडबाय ट्रेलर पाहता हा चित्रपट जीवन, कुटुंब आणि नातेसंबंधांबद्दल हृदयस्पर्शी कथा उलगडताना दिसणार आहे.
या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका बॉलीवूड पदार्पण करत आहे, जो 7 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. विकास बहल दिग्दर्शित, या चित्रपटात नीना गुप्ता आणि पावेल गुलाटी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एली अवराम, सुनील ग्रोव्हर आणि साहिल मेहता देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.