मुंबई : हनीट्रॅप हा शब्द हल्ली वारंवार ऐकू येऊ लागला आहे. दुश्मन देशाचे प्रतिनिधी दुसऱ्या देशाच्या लष्करी अथवा तत्सम मोठ्या शासकीय अधिकाऱ्याला तरुणी या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि मग त्या तरुणी त्याच्याकडून देशाची गुपितं माहिती काढून घेऊन शत्रू देशांना देतात. याला आपण हनीट्रॅप म्हणतो. नजीकच्या काळात अश्या प्रकारच्या बऱ्याच घटना आपल्या देशात उघडकीस आल्या असून त्यांची चौकशी चालू असून संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.
हनीट्रॅप विषयाशी निगडीत : याच हनीट्रॅपचा विषय आगामी मराठी चित्रपट 'गेमाडपंथी' या वेब सिरीज मधून हाताळण्यात आला आहे. 'गेमाडपंथी' या वेब सिरीजमध्ये एक साधा सरळ मुलगा एका जबरदस्त प्लॅनचा शिकार होतो आणि एका हनीट्रॅपमध्ये अडकतो. त्याच्यासारख्या मुलाला हनीट्रॅपमध्ये अडकाविण्याचे कारण काय या सिरीजमधूनच याचा उलगडा होईल. या वेब सिरीजचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. तसेच नुकताच या वेब सिरीजचा ट्रेलर हा प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये चिकू नावाचा व्यक्ती किडनॅपिंगचा प्लॅन बनताना दिसत आहे. हा प्लॅन तो का बनवत आहे हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ही वेब सिरीज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठीवर बघायला मिळणार आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची या वेब सिरीजला बघण्याची उत्सुकता वाढली आहे.