मुंबई - Ganapath Box Office Collection Day 4 : टायगर श्रॉफचा अॅक्शन चित्रपट 'गणपथ: ए रियल हिरो इज बॉर्न' या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. टायगर 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे क्रिती सेनॉनसोबत दिसला आहे. सध्या ‘गणपथ’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खराब प्रतिसाद मिळाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. 'गणपथ'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी खूप कमी कमाई केली आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' चित्रपटात टायगर आणि क्रिती व्यतिरिक्त अमिताभ बच्चन देखील महत्त्वाची भूमिक्त आहे.
'गणपथ'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : टायगरला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र आता प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयस्वी ठरला आहे. वीकेंडकडून निर्मात्यांना खूप आशा होती, पण चित्रपटाच्या कमाईत कोणतीही वाढ झालेली नाही. 'गणपथ'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं या चित्रपटानं रिलीच्या पहिल्या दिवशी 2.50 कोटीची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 2.25 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 2.25 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 7 कोटी झाले आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या चौथ्या दिवसात आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा चित्रपट 1 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 8 कोटी होईल.