मुंबई :सनी देओल स्टारर 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या राज्य करत आहे. हे दोन्ही चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली. 'गदर 2' च्या तुलनेत 'ओएमजी 2'ने बॉक्स ऑफिसवर कमी कमाई केली आहे. 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर कहर केला आहे. हा चित्रपट रिलीजच्या विसाव्या दिवशी देखील चांगली कमाई करत आहे. 'गदर 2' 500 कोटीचा आकडा पार करण्यास काही पावले दूर आहे. तर 'ओएमजी 2' हा 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी धडपडत करत आहे. या दोन्ही चित्रपटाने रिलीजच्या विसाव्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया...
'गदर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन :सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'गदर 2'ने तिसर्या शुक्रवारी 7.10 कोटी, तिसर्या शनिवारी 13.75 कोटी, तिसर्या रविवारी 16.10 कोटी, तिसर्या सोमवारी 4.60 कोटी, तिसर्या मंगळवारी. 5.09 कोटी कमावले. हा चित्रपट तिसर्या बुधवारी 5.91 कोटी रुपये कमावण्याची अपेक्षा केली जात आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 471.65 कोटी होऊ शकेल. हा चित्रपट रोज अनेक रेकॉर्ड तोडत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' हा 2001 मधील सुपरहिट 'गदर: एक प्रेम कथा' चित्रपटचा सीक्वल आहे. 'गदर 2' चित्रपटात सनी देओल व्यतिरिक्त अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मनीष वाधवा आणि गौरव चोप्रा हे प्रमुख भूमिकेत आहेत.