मुंबई : सनी देओलचा चित्रपट 'गदर २' बॉक्स ऑफिसवर खूप जबरदस्त कमाई करतोय. या चित्रपटाने १० दिवसात बॉक्स ऑफिसवर ३०० कोटीचा टप्पा पार केलाय. 'गदर २'ची क्रेझ कमी होण्याचं नाव घेत नाहीय. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप गर्दी करतायत. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'गदर २'ने पहिल्या दिवशी ४०.०१ कोटी रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. त्यानंतर हा चित्रपट कमाईच्याबाबत मोठमोठी शिखरं ओलांडतोय. या चित्रपटाने सुरुवातीच्या वीकेंडमध्ये म्हणजेच तीन दिवसांत १३४.८८ कोटी कमावले. 'गदर २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप झपाट्याने कमाई करतोय.
'गदर २'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : दुसरीकडे, आता जर आपण 'गदर २' च्या ताज्या कलेक्शनवर नजर टाकली तर 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या वीकेंडला चांगलीच कमाई केलीय. शुक्रवारी या चित्रपटाने २० कोटींहून अधिक कलेक्शन केले. त्यानंतर शनिवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३१.०७ पर्यतचा आकडा गाठला. दरम्यान सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार रविवारी म्हणजेच १० व्या दिवशी 'गदर २'ने देशांतर्गत ४१ कोटींचा व्यवसाय केलाय. यासह, चित्रपटाने १० दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे ३७७.२० कोटींचा व्यवसाय केलाय.' गदर २' ने ३५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच ४०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होईल, असं दिसतय.
'गदर २'ची बॉक्स ऑफिस कमाई
१ दिवस- ४०.१० कोटी
२ दिवस - ४३.०८ कोटी
३ दिवस - ५१.७० कोटी
४ दिवस - ३८.७० कोटी
५ दिवस - ५५.४० कोटी