मुंबई : बॉक्स ऑफिसवर सध्या 'गदर २' चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. २०२३ वर्ष बॉलिवूडसाठी खूप चांगले ठरत आहे. 'द केरळ' स्टोरी'नंतर 'गदर २' रुपेरी पडद्यावर धमाल करत आहे. 'पठाण'ने ५०० कोटी, 'गदर २'ने ३०० कोटी आणि 'द केरळ स्टोरी'ने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा आकडा पार केला आहे. 'गदर २' बद्दल बोलायचे झाले तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने २८० कोटींहून अधिक कमाई केली आणि आठ दिवसांत या चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा पार केला. दरम्यान शाहरुख खानच्या 'पठाण'ने पहिल्या आठवड्यातच ३०० कोटींचा टप्पा पार केला. आता असे बोलले जात आहे की 'गदर २' देशांतर्गत कलेक्शनमध्ये 'पठाण'ला मात देत आहे.
'गदर २ ' कमाई
पहिला दिवस - ४०.१० कोटी
दुसरा दिवस - ४५ कोटी
तिसरा दिवस - ५२ कोटी
चौथा दिवस - ३८ कोटी
पाच दिवस - ५५ कोटी
सहा दिवस - ३२ कोटी
सातवा दिवस - २२ कोटी
एकूण - २८४.१० कोटी पहिल्या आठवड्याचे कलेक्शन
'पठाण'ची कमाई
पहिला दिवस - ५५ कोटी
दुसरा दिवस - ६८ कोटी
तिसरा दिवस - ३८ कोटी
चौथा दिवस - ५१.५० कोटी
पाच दिवस - ५८.५० कोटी
सहावा दिवस - २५.५० कोटी
सातवा दिवस - २२ कोटी
एकूण - ३१८.५० कोटी पहिल्या आठवड्याचे कलेक्शन
'गदर २' पठाणला हरवणार? : 'गदर २' देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'पठाण'ला मागे टाकू शकते. 'पठाण' या चित्रपटाचे देशांतर्गत कलेक्शन ५२५ कोटी झाले आहे. दरम्यान 'गदर २' ला येथे पोहोचण्यासाठी आता आणखी एक आठवडा शिल्लक आहे, तसेच आता आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट देखील २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे 'पठाण'ला पराभूत करण्यासाठी 'गदर २' ला फक्त एक आठवडा शिल्लक आहे. 'गदर २' हा चित्रपट 'पठाण'चा विक्रम बॉक्स ऑफिसवर मोडेल असे सध्या दिसत आहे.
हेही वाचा :
- Vijay Varma and Tamannaah bhatia : विजय वर्माने तमन्ना भाटियासोबतच्या नात्यावर केला खुलासा...
- Ghoomer Collection Opening Day : 'घूमर' चित्रपट पहिल्याचं दिवशी आला व्हेंटिलेटरवर....
- Jailer box office collection 9 day : 'जेलर' चित्रपटाने घेतली मोठी भरारी; जाणून घ्या नवव्या दिवसाचे कलेक्शन...