हैदराबाद : G Marimuthus death आज सकाळी ८ च्या सुमारास दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे डबिंग करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने जी मरिमुथु बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मरिमुथु तमिळ अभिनेता दिग्दर्शक शेवटचे रजनीकांतच्या ब्लॉकबस्टर चित्रपट जेलरमध्ये दिसले होते. चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी शुक्रवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वर या बातमीला दुजोरा दिला आहे.
सहकलाकाराच्या निधनावर शोक : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी जेलर चित्रपटातील त्यांच्या सहकलाकाराच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याचवेळी या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता छातीत दुखण्याबद्दल बोलत आहे. रजनीकांत यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये तमिळ भाषेत लिहून अभिनेत्याच्या निधनाला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त करत रजनीकांत यांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.
मरिमुथु यांचा व्हिडिओ व्हायरल :मरिमुथु साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जेलर' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याचवेळी आता या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो छातीत दुखत असल्याची तक्रार करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेली ही क्लिप 'इथिर निचल' याच शोची आहे. ज्याच्या डबिंगदरम्यान अभिनेत्याचा मृत्यू झाला होता. आता ही क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि लोक ती शेअर करून अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेता छातीत दुखत असल्याची तक्रार करताना दिसत आहे. मरिमुथु आपल्या सहकलाकारासह कारमध्ये बसून हा सीन करत आहे.
जी मरिमुथु यांच्या निधनाने तमिळ इंडस्ट्रीला बसला मोठा धक्का :जी मरिमुथु यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नई येथील त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यांच्या मूळ गावी थेणी येथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचवेळी त्यांच्या आकस्मिक निधनाने तमिळ इंडस्ट्रीला धक्का बसला असून अनेक सेलिब्रिटी आणि चाहते दिवंगत अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
- Vicky Kaushal Janmashtami 2023 : विक्की कौशलने साजरी केली बाळगोपाळांसोबत दहीहंडी, पाहा लक्षवेधी फोटो
- Mission Raniganj teaser out: अक्षय कुमार स्टारर 'मिशन राणीगंज'चा टिझर झाला प्रदर्शित...
- Asha Bhosle Birthday : चिरतरुण आवाजाच्या सदाबहार गायिका आशा भोसलेंचा वाढदिवस; गाण्यांच्या जादूनं जिंकलं जग...