नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कुस्तीपटू निदर्शने करत असताना त्यांना आता लोकगायिका नेहा सिंग राठौरची साथ मिळाली आहे. नेहा सिंह राठौरने तिच्या गाण्यांमधून सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या नेहा सिंग राठौरचे 'मेडल बहे गंगा धाई ए सेंगोल सरकार' हे नवीन गाणे फार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नेहा सिंग राठौरने कुस्तीपटूंच्या कामगिरीचे कौतुक केले तर या गाण्याद्वारे तिने सरकारची खिल्ली उडवली आहे. तसेच लोकगायिका नेहा सिंग राठौरने गाणे शेअर करत आपल्या नव्या गाण्यात तिने नवीन संसद भवन, सेंगोल, खेळाडूंची कामगिरी आणि पदक गंगेत फेकण्याचा केलेला प्रयत्न यांचा उल्लेख केला आहे. नेहा सिंग राठौरने तिच्या गाण्याचा काही भाग ट्विटरवर शेअर केला आहे.
नेहा सिंग राठौरचे नवीन गाणे : खेळाडूंना त्यांची पदके गंगेत सोडण्यास भाग पाडले जात आहे, याला जबाबदार कोण? याचे उत्तर 'सेंगोल सरकारने' द्यावे. जंतर-मंतरवरून होणारी याचिका सरकार कधी ऐकणार? एवढेच नाही तर फोटो काढण्यातून मोकळा वेळ मिळत असेल तर देशाची स्थिती काय आहे, याकडेही सरकारने लक्ष द्यावे, असेही तिने म्हटले आहे. नेहा सिंग राठौरच्या या नव्या गाण्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सनी नवीन गाण्याचे कौतुक केले आहे तर काहींनी त्यावर टीका केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, 'आता काहीतरी नवीन आण...त्याच प्रकारच्या गोष्टी कंटाळवाण्या होऊ लागल्या आहे. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, की, 'साक्षी खून प्रकरणातही काही व्हायला हवे?' तर आणखी एका वापरकर्त्याने लिहिले की, '4 कुस्तीपटूंनी घोषणा केली की आम्ही गंगाजीमध्ये आमचे पदक विसर्जित करू, त्यामुळे या मॅडने लगेच एक गाणे बनवले. आता हा कार्यक्रम रद्द होणार हे कुणास ठाऊक, आता गाणे तयार झाले आहे, आणि शेअर पण केले आहे' अशाप्रकारच्या अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहे.