महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Homesick trailer : फरहान अख्तरने शेअर केला धाकटी मुलगी अकिराच्या 'होमसिक'चा ट्रेलर - Farhan Akhtar shares trailer of daughter

फरहान अख्तरची धाकटी मुलगी अकिरा अख्तर हिनेही कलेचा वारसा जपला आहे. 'होमसिक' या लघुपटात ती अभिनय करत आहे. या फिल्मचा ट्रेलर फरहानने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Homesick
'होमसिक'चा ट्रेलर

By

Published : Aug 12, 2023, 3:30 PM IST

मुंबई- बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने सोशल मीडियावर आपली मुलगी अकिरा अख्तरच्या 'होमसिक' शॉर्ट फिल्मचा ट्रेलर शेअर केला आहे. अकिराची ही शॉर्ट फिल्म येत्या १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. यासाठी फरहानने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या शॉर्ट फिल्मचे काही भागाचे शुटिंग फरहानच्या मुंबईतील घरी पार पडल्याचेही त्याने सांगितले.

नवोदित चित्रपट निर्माता अहान वकनल्ली दिग्दर्शित होमसिकचा ट्रेलर फहरहानने शनिवारी सोशल मीडियावर शेअर केला. फहहानची लेक अकिरा होमलिक या लघु चित्रपटात श्रुतंत रामास्वामीसोबत मुख्य भूमिका साकारत आहे. 'काही आठवड्यापूर्वी अकिराने मला विचारले की तिचे काही मित्र शूट करत अलेल्या शॉर्ट फिल्मसाठी एक किंवा दोन सीन शूट करण्यासाठी येणार का? मला आश्चर्य वाटले आणि आनंदाने मी हो म्हणालो. मी तिला विचारले की किती लोक क्रू मेंबर्स म्हणून येणार आहेत, कारण आकडा माहिती असला तर नियोजनाला सोपे जाते. ती म्हणाली दिग्दर्शकाला पकडून एकूण ३ लोक आहेत. त्या होमसिक लघुपटाचा इथे ट्रेलर शेअर करताना आनंद वाटतोय. '

एक वडील या नात्याने लेकीच्या शॉर्ट फिल्मसाठी येणाऱ्या क्रू मेंबर्सची काळजी घ्यायची ठरवणाऱ्या फरहानला लेकीच्या उत्तराने चांगला धक्का बसला. फरहानने आपल्या १६ वर्षांच्या मुलीचे कथा कथनावरील प्रेम असेच आयुष्यभर टीकावे अशी अपेक्षा केली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येईल यासह फरहानने आपल्या पोस्टचा शेवट केला आहे.

अकिरा ही फरहानची माजी पत्नी आणि हेअरस्टायलिस्ट अधुना भाबानी हिची लहान मुलगी आहे. फरहान आणि अधुना यांनी २०१७ मध्ये १६ वर्षाच्या सहजीवनानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची मोठी मुलगी शाक्य अख्तर हिने अलीकडेच यूकेच्या लँकेस्टर विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे तर अकिरा देखील लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.

दरम्यान, फरहान अख्तरने अलीकडेच रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या 'डॉन 3' चित्रपटाची घोषणा केल्यामुळे सध्या चर्चेत आहे. या आगामी चित्रपटातून तो १२ वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहे. डॉन 3 च्या आधी तो प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका असलेल्या 'जी ले जरा' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

हेही वाचा -

१.Jawan Song Chaley: शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील दुसरे गाणे होणार लवकरच प्रदर्शित...

२.Gadar 2 Vs Omg 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ चित्रपट 'ओह माय गॉड २'वर पडला भारी...

३.Jailer Box Office Collection Day 2 : रजनीकांतच्या 'जेलर'ने दोन दिवसांत केली 'छप्परफाड' कमाई

ABOUT THE AUTHOR

...view details