मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर आता आपल्यात नाहीत. 2020 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे चाहते हादरले आणि कपूर कुटुंबावर शोककळा पसरली होती. आता एका व्यक्तीने ऋषी कपूर परत येत असल्याचं म्हटलं आहे.
सोनी वाहिनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दीवाने ज्युनियर' चा व्हिडिओ शेअर केला आहे. हा एक प्रोमो व्हिडिओ आहे, ज्यामध्ये फराह खान आणि नीतू कपूर दिसत आहेत.
या शोचे सूत्रसंचालन करणारा टीव्ही अभिनेता करण कुंद्रा या व्हिडिओमध्ये ''नीतू जी, तुम्ही आजी होणार आहात, आमच्या सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा'' असे म्हणतो. यावर नीतू सिंह म्हणतात, ''धन्यवाद, तुम्हाला माहिती आहे, यापेक्षा चांगली बातमी असू शकत नाही.''