महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कपूर खानदानातील बेस्ट डान्सर आहे माझा मुलगा रणबीर कपूर : नीतू कपूर - ईटीव्ही भारत प्रतिनिधीसोबत नीतू कपूर

नीतू कपूर यांची खास मुलाखत आमच्या प्रतिनिधीने घेतली. कपूर खानदान त्याच्या पार्ट्या आणि डान्सेस साठी प्रसिद्ध आहेत. कपूर खानदानातील बेस्ट डान्सर कोण हे विचारल्यावर नीतूजी ताबडतोब उतरल्या, “माझा मुलगा, रणबीर." पुढे त्या काय म्हणाल्या याविषयी सविस्तर वाचा...

रणबीर आणि नीतू कपूर
रणबीर आणि नीतू कपूर

By

Published : Apr 21, 2022, 5:22 PM IST

मुंबई - नुकतेच रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे शुभमंगल झाले आणि त्यावेळी नीतू कपूर जातीने सर्व व्यवस्था पाहताना दिसत होत्या. ‘माझे पती, स्व. ऋषी कपूर यांच्या इच्छेप्रमाणे सर्व काही पार पडले याचा मला आनंद आहे. वरून ते बघत असतील आणि त्यांना माझ्याबद्दल नक्कीच गर्व वाटत असेल’, अशा भावना नीतू कपूर यांनी व्यक्त केल्या होत्या. आता त्या डान्स दिवाने ज्युनियर या डान्स रियालिटी शोच्या जजच्या खुर्चीत बसत असून त्या निमित्ताने नीतू कपूर यांनी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत संवाद साधला.

नीतू कपूर

“मी डान्स दिवाने ज्युनियर या डान्स रियालिटी शो मध्ये परीक्षकाच्या खुर्चीत बसण्यासाठी खूप उत्सुक आहे, आनंदी आहे आणि या नवीन आव्हानासाठी तयार सुद्धा आहे. माझ्यासाठी आयुष्यातील हा नवीन टप्पा आहे आणि मी तो माझ्या मर्जीने निवडला आहे. माझे पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतर आयुष्य कठीण वाटत होतं. परंतु माझ्या कुटुंबाच्या मदतीने मी पुन्हा धीराने उभी राहू शकत आहे. घरात एकटेपणाने दुःखी राहण्यापेक्षा दुसरीकडे मन रमविले पाहिजे हे ते मला पटवून देत होते. त्याचसुमारास ‘जुग जुग जियो’ माझ्याकडे आला आणि त्या चित्रपटात काम करण्यासाठी मी होकार दिला. शूटिंगचा पहिला दिवस खूप कठीण होता परंतु हळूहळू मी सावरत गेले आणि चित्रपटाच्या टीमने मला खूप सांभाळले आणि मी तो चित्रपट आत्मविश्वासाने पूर्ण केला. त्यानंतर हा शो आला आणि एक वेगळा एक्सपीरियन्स म्हणून मी होकार दिला. अर्थात रणबीर कपूरने मला खूप प्रोत्साहन दिले आणि त्याचा फायदा मला नक्कीच होतोय”, नीतू कपूर ने आपल्या नवीन कामाबद्दल सांगितले.

नीतू आणि ऋषी कपूर

नीतू सिंग (खरे नाव हरनीत सिंग) ने लहानपणापासूनच अभिनयक्षेत्रात काम सुरु केलं होतं. त्यानंतर ती हिंदी चित्रपटांतील आघाडीची नायिका बनली. दिवंगत ऋषी कपूर सोबत लग्न झाल्यानंतर तिने प्रसिद्धीच्या शिखरावर असून देखील चित्रपट सन्यास घेतला आणि दोन मुलांना, मुलगी रिद्धिमा आणि मुलगा आताच आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर, वाढवत संसारात रमली. “खरंतर ऋषी जी काम करीत होते आणि त्याचे सर्वकाही करण्यात माझा वेळ जात असे. परंतु एका असाध्य आजाराने त्यांना ग्रासले आणि त्यांना अकाली एक्सिट घ्यावी लागली. मी एकटी पडले होते. मला दुःख कुरवाळत बसायचे नव्हते त्यामुळे मी घरच्यांच्या सल्ल्याने घराबाहेर पडायचे ठरविले. आता काम करणे हीच माझ्यासाठी ‘हीलिंग प्रोसेस’ आहे. मला स्वतःला आता खूष राहायचे आहे आणि ऋषीजींचीही तीच इच्छा होती. माझ्या मुलांनाही मला खूष बघायचे आहे”, नीतू जी मनापासून व्यक्त होतं म्हणाल्या.

डान्स दिवाने ज्युनियर मधील लहानग्या डान्सर्स बद्दल सांगताना नीतू जी म्हणाल्या, “आजकालची मुलं काय भन्नाट डान्स करतात, बापरे. मला तर काही डान्स फॉर्म्सबद्दल माहीतही नाही. मला नृत्य करायला आवडते आणि ते मी केलेल्या ऐंशीएक चित्रपटांतून दिसून येतेच. मी स्वतः भरत नाट्यम शिकले आहे परंतु या नवीन डान्स फॉर्म्स बद्दल मी अनभिज्ञ आहे आणि ते सांगताना मला कुठेही अपमानास्पद वाटत नाही. आमच्याकाळी लटके-झटके, ठुमके, भगवान दादा स्टाईल डान्स ई. होते, बस्स. पण आता हे विश्व इतकं पुढे गेलंय आणि आपली पोरं त्यात इतकी पारंगत आहेत हे पाहून अभिमान वाटतो. अर्थात त्या टेक्निकल गोष्टी मला माझे सहकारी जजेस नोरा फतेही आणि मरझी सांगतात. ते दोघेसुद्धा लहान मुलांप्रमाणे आहेत, सारखे भांडत असतात. मला सर्वांना चूप करावं लागतं. सर्व मुलं हार्ड कोअर डान्सर्स आहेत. ती इतकी गोड आहेत की मी कोणाबद्दलही वाईट कॉमेंट देऊ शकत नाही. मी एक इमोशनल जज आहे आणि नेहमी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. नोरा सुद्धा माझ्यासारखीच आहे. आणि वाईट गोष्टी किंवा त्रुटी सांगण्याची जबाबदारी मरझीकडे सोपविण्यात आली आहे आणि तोसुद्धा कोणालाही न डिवचता ते करतो याचा आनंद आहे.”

ईटीव्ही भारत प्रतिनिधीसोबत नीतू कपूर

नीतू कपूर यांची ‘सेकंड इनिंग्स’ कशी सुरु आहे याबद्दल सांगताना त्यांचा चेहरा खुलला आणि त्या म्हणाल्या, “मी जे काही करते ते मनापासून करते. आता हेच बघाना, नुकताच येऊन गेलेला ऋषीजींचा ‘शर्माजी नमकीन’ त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यात माणसाच्या ‘सेकंड इनिंग्स’ बद्दल सांगण्यात आलं आहे. चित्रपटासाठी ते इतके उत्साहित होते की ऋषीजींनी आपले सगळे केस पांढरे केले. परंतु शूट सुरु होण्याआधी त्यांना कॅन्सर झाल्याचे कळले आणि आम्ही त्यांना न्यूयॉर्क ला घेऊन गेलो. त्यांचे फोटो पाहून सर्वांनी ग्रह करून घेतला की आजारपणामुळे त्यांचे केस पांढरे झालेत. परंतु ते सत्य नव्हते. परत आल्यावर त्यांनी या चित्रपटाचे शूट सुरु केले. परंतु दिल्लीत असताना त्यांना इन्फेक्शन झाले आणि महिन्याभरातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. आम्ही हळूहळू सावरत आहोत. मला चांगले रोल्स करायचे आहेत. स्ट्रॉंग कॅरेक्टर्स, रिलेटेबल रोल्स, हृदयाला भिडणाऱ्या भूमिका करायच्या आहेत. तशी भूमिका असेल तरच मी कारेन अन्यथा मी ट्रॅव्हल करण्यात, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालविण्याला प्राधान्य देईन. माझ्या ‘सेकंड इनिंग्स’ सुरुवात छान झालीय आणि मला खात्री आहे की मी १००% ओके होणार.”

कपूर खानदान त्याच्या पार्ट्या आणि डान्सेस साठी प्रसिद्ध आहेत. कपूर खानदानातील बेस्ट डान्सर कोण हे विचारल्यावर नीतूजी ताबडतोब उतरल्या, “माझा मुलगा, रणबीर. ऋषी जी, शम्मीजी जी हे उत्तम डान्सर्स म्हणून ओळखले जायचे परंतु माझ्यामते ते उत्तम डान्सर्स नव्हे तर उत्तम परफॉर्मर्स होते. दोघांचेही ‘लेग वर्क’ अतिशय खराब होते परंतु ते चेहऱ्याने उत्तम डान्स करायचे. परंतु माझा मुलगा रणबीर अप्रतिम डान्सर आहे. त्याच्याकडे स्टाईल आहे, ‘स्वॅग’ आहे आणि तो माझा अभिमान आहे.”

हेही वाचा -नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' Ott रिलीजसाठी सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details