महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Evelyn Sharma : एव्हलिन शर्माने नवजात मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर केली शेअर... - तुषान भिंडी

एव्हलिन शर्माने आपल्या दुसऱ्या बाळाची ओळख करून देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये तिच्या नवजात मुलाचे नाव जाहीर केले.

Evelyn Sharma
एव्हलिन शर्मा

By

Published : Jul 7, 2023, 12:34 PM IST

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री एव्हलिन शर्मा ही आता चर्चेत आली आहे. एव्हलिन ही पुन्हा एकदा आई झाली आहे. एव्हलिनने काल रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने पुन्हा एकादा आई झाल्याचे सांगतिले आहे. एव्हलिनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तिने यावेळी मुलाला जन्म दिला आहे. 2021 मध्ये तिने अवा या मुलीला जन्म दिला होता. आता पुन्हा एकदा तिने मुलाला जन्म दिला असून तिने आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. एव्हलिनने तिच्या नवजात मुलासोबतचे फोटोही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या नवजात मुलाचे नाव देखील जाहीर केले आहे. एव्हलिनने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटामुळे चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. या चित्रपटात तिने चांगला अभिनय केला होता.

मुलाचे नाव काय आहे ? : चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जन्म दिल्यानंतर मला इतके चांगले वाटेल, असे कधीच वाटले नव्हते. मी गच्चीवर उभे राहून गाणे म्हणू शकते याचा मला खूप आनंद आहे. आमच्या लहान मुलाला आर्डेन भिंडीला नमस्कार म्हणा. असे तिने पोस्टमध्ये लिहले आहे.

एव्हलिनचे लग्न कधी झाले? : एव्हलिनने 15 मे 2021 रोजी तुषान भिंडीशी लग्न केले होते. तिच्या लग्नात, कुटुंबातील सदस्य आणि जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता. तर, 18 नोव्हेंबर 2021 रोजी एव्हलिनने एका मुलीला जन्म दिला. ती तिच्या कुटुंबासह परदेशात राहते.

दुसरी गर्भधारणा घोषणा :जानेवारी 2023 मध्ये तिने तिच्या पूर्ण गर्भधारणेची गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली होती. त्यादरम्यान तिने एक फोटो शेअर केला होता, या फोटोमध्ये तिने तिचा बेबी बंपववर हात ठेवला होता.

एव्हलिनचा वर्कफ्रंट :लग्नानंतर एव्हलिन ही चित्रपटांमध्ये दिसली नाही. 'ये जवानी है दिवानी', 'नौटंकी साला', 'यारियां', 'मैं तेरा हीरो', 'कुछ कुछ लोचा है' यासारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. तिने 'फ्रॉम सिडनी विथ लव्ह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.

हेही वाचा :

  1. Sushmita Sen : सुष्मिता सेनने आपल्या मुलीसोबत आयफेल टॉवरसमोर केला डान्स...
  2. Angira Dhar IMDb Breakout Star : अंगिरा धरला बनली वर्षातील दुसरी ब्रेकआउट स्टार, आयएमडीबीची घोषणा
  3. Amruta in Sacred Games 2 : अमृता सुभाषने सांगितली इंटिमेट सीन्सची आठवण, मासिक पाळीच्या तारखा लक्षात घेऊन झाले होते शुटिंग

ABOUT THE AUTHOR

...view details