महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दुबईत 'डंकी'चं जोरदार प्रमोशन, ड्रोन शोमध्ये साकारली किंग खानची सिग्नेचर पोज - Dunki Promotion

Dunki Promotion in Dubai: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफामध्ये शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. याशिवाय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास ड्रोन शोचे आयोजन करण्यात आलं होतं. सध्या सोशल मीडियावर काही हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

Dunki Promotion in Dubai:
दुबईमध्ये डंकीचं प्रमोशन

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 11:17 AM IST

मुंबई - Dunki Promotion in Dubai : अभिनेता शाहरुख खान सध्या त्याचा आगामी कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'डंकी'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. गेल्या मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर जगातील सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफा येथे प्रदर्शित करण्यात आला होता. किंग खानच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईत खास ड्रोन शोचेही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी किंग खानला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. या शोचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय सध्या 'डंकी'ची आगाऊ बुकिंग ही जोरदार सुरू आहे.

शाहरुख खान स्टारर 'डंकी' चित्रपटाचं प्रमोशन :शाहरुखच्या उपस्थितीत या शो दरम्यान अनेक दिवे आकाशात विखुरताना दिसले. शाहरुख खानच्या नावापासून ते 'डंकी' शीर्षकापर्यंतचे नमुने आणि किंग खानच्या स्वाक्षरीच्या ओपन आर्म पोझपर्यंतचे नमुने ड्रोनद्वारे आकाशात तयार करण्यात आले होते. किंग खानच्या फॅन क्लब या भव्य कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये किंग खानची झलक पाहायला मिळत आहे. फोटोत शाहरुखनं काळ्या रंगाची टी-शर्ट आणि मॅचिंग डेनिम्ससह लाल जाकीट घातला आहे. याशिवाय त्यानं यावर सनग्लास लावला आहे.

'डंकी' चित्रपटाचं प्रमोशन : दुबईमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि लेखक अभिजात जोशीही उपस्थित होते. 'डंकी' बद्दल बोलायचं झालं तर शाहरुख व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये तापसी पन्नू, बोमन इराणी आणि विकी कौशल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन यांनी लिहिलेला 'डंकी'ची कहाणी चार मित्रांवर आधारित आहे, जे परदेशात जाण्यासाठी खूप प्रयत्न करतात. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता सध्या या चित्रपटाची खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. 'डंकी' हा चित्रपट किंग खानचा या वर्षातील तीसरा चित्रपट आहे. या चित्रपटाकडून त्याला खूप अपेक्षा आहेत.

हेही वाचा :

  1. किंग खानची पत्नी गौरीला ईडीची नोटीस; 'या' प्रकरणी होणार चौकशी
  2. 2023 मध्ये ओटीटीवर पदार्पण करणारे साऊथ आणि बॉलिवूडचे कलाकार
  3. 'डंकी'ची फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिट बुकिंगसाठी किंग खानचे चाहते ढोल ट्रॅक्टरसह पोहचले चित्रपटगृहात

ABOUT THE AUTHOR

...view details