मुंबई - Dunki Box Office Collection Day 11: 'डंकी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या अकराव्या दिवशी जोरदार कमाई करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 'सालार'शी संघर्ष करत आहे. शाहरुख खान स्टारर 'डंकी' 21 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलं आहे. 'डंकी' चित्रपट कॉमेडी आणि इमोशननं परिपूर्ण आहे. 'डंकी'त शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, बोमन इराणी, अनिल ग्रोव्हर, विकी कौशल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाबाबत बॉक्स ऑफिसवर प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. शाहरुख खाननं यावर्षी दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता हा चित्रपट देखील रुपेरी पडद्यावर धमाल करताना दिसत आहे.
'डंकी' चित्रपटाचं एकूण कलेक्शन :सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'डंकी'नं ओपनिंग दिवसाला 29.2 कोटीचा व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथा दिवशी 30.7 कोटी, पाचवा दिवशी 24.32 कोटी, सहावा दिवशी 11.56 कोटी आणि सातव्या दिवशी 10.5 कोटी, आठव्या दिवशी 8.21 कोटी आणि नवव्या दिवशी 7.25 कोटी, दहाव्या दिवशी 9 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 176.47 कोटी झालं आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या अकराव्या दिवसात आहे. रिलीजच्या अकराव्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7.25 कोटीची कमाई करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
'डंकी'ची एकूण कमाई
पहिला गुरुवार पहिला दिवस - 29.2 कोटी
पहिला शुक्रवार दुसरा दिवस - 20.12 कोटी
पहिला शनिवार तिसरा दिवस - 25.61 कोटी
पहिला रविवार चौथा दिवस - 30.7 कोटी
पहिला सोमवार पाचवा दिवस - 24.32 कोटी