महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बायकॉट बॉलिवूडची खिल्ली उडवत ड्रीम गर्ल २ च्या रिलीज तारखेची घोषणा - पाहा व्हिडिओ - Boycott Bollywood and Ananya Panday

ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित झाली असून निर्मात्यांनी यासाठी एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केलाय. यात सध्या बॉलिवूड सिनेमाला ट्रोल केले जात असलेल्या बायकॉट बॉलिवूडची खिल्ली उडवत आणि अनन्या पांडेच्या सेन्स ऑफ ह्युमरचा मजेशीर वापर केला आहे.

ड्रीम गर्ल २ च्या रिलीज तारखेची घोषणा
ड्रीम गर्ल २ च्या रिलीज तारखेची घोषणा

By

Published : Sep 16, 2022, 5:25 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि अनन्या पांडे ( Ayushamnn Khurrana and Ananya Panday ) पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आयुष्मान आणि अनन्या ( Ayushmann and Ananya ) ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसणार आहेत, यासाठी निर्मात्यांनी रिलीजची तारीख ब्लॉक केली आहे. शुक्रवारी, निर्मात्यांनी ड्रीम गर्ल 2 रिलीजची तारीख ( Dream Girl 2 release date ) जाहीर करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

एकता कपूरचा चित्रपट बॅनर बालाजी मोशन पिक्चर्स ड्रीम गर्ल 2 ची विर्मिती करत आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर ड्रीम गर्ल 2 ची रिलीज डेट जाहीर करण्यासाठी बॉलीवूडच्या घसरणीचा आणि अनन्या पांडेच्या सेन्स ऑफ ह्यूमरचा मजेदार व्हिडिओसह घोषणा केली.

ड्रीम गर्ल 2 च्या रिलीज तारखेसाठी घोषणा व्हिडिओ शेअर करताना, निर्मात्यांनी सोशल मीडियावर लिहिले: "आपकी ड्रीम गर्ल फिर से आ रही है, मिलिये पूजा से 29 जून 2023 की ईद पर #DreamGirl2 29 जून 2023 रोजी सिनेमागृहात."

आयुष्मान आणि अनन्याने नुकतेच मथुरा येथे ड्रीम गर्ल 2 साठी शूटिंग केले. अनन्याच्या या चित्रपटातील कास्टिंगची चर्चा झाली होती कारण तिने अलिकडेच भगवान कृष्णाच्या जन्मस्थान मथुरा येथून फोटो पोस्ट केले होते. नंतर जेव्हा ड्रीम गर्ल 2 टीमने आशिया कपमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा विजय साजरा केला तेव्हा या बातमीला दुजोरा दिला होता. ड्रीम गर्ल 2 कास्ट आणि क्रूसह दोन्ही कलाकार टीम इंडियाच्या लॉकर रूम व्हिडिओची नक्कल करून विजय साजरा करताना दिसले ज्यात मेन इन ब्लूने काला चष्मा या सुपरहिट गाण्यावर नृत्य केले होते.

2019 मध्ये रिलीज झालेल्या, ड्रीम गर्लला ब्लॉकबस्टर हिट घोषित करण्यात आले होते. या चित्रपटाचे कथानक एका पुरुष अभिनेत्याभोवती फिरते जो स्थानिक नाटकात स्त्री भूमिका करत असतो.

हेही वाचा -दीपिका पदुकोण दिल्लीत रॉजर फेडररसोबत टेनिस खेळतानाचा जुना फोटो व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details